मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सावधान! सिझेरियन प्रसूतीला घाबरणे टाळा: घरीच बाळंतपण ठरेल जीवघेणे

सावधान! सिझेरियन प्रसूतीला घाबरणे टाळा: घरीच बाळंतपण ठरेल जीवघेणे

रुग्णालय

रुग्णालय

जिल्हा रुग्णालयामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत प्रसूती केली जाते. अवघ्या तीन महिन्यांमध्ये 2250 प्रसूती झाल्या असून अनेक जणांना मृत्यूच्या दारातून वापस देखील आणण्यात यश आले आहे.

    बीड, 18 ऑगस्ट : प्रगतिशील महाराष्ट्रातील ग्रामीण भागात मातांचे बाळंतपण घरीच करण्याचे प्रकार घडतात. झोपडपट्ट्यांपासून तर दुर्गम भागातील गावांमध्ये दळणवळणाची सोय तसेच अनेक गैरसमजातून हे प्रकार घडतात. यामुळे घरीच प्रसूतीचा पर्याय नाइलाजाने स्वीकारला जातो. मात्र, जिल्हा रुग्णालयामध्ये अद्ययावत तंत्रज्ञानाच्या आणि तज्ञ डॉक्टरांच्या मदतीने मोफत प्रसूती  केली जाते. अवघ्या तीन महिन्यांमध्ये 2250 प्रसूती  झाल्या असून अनेक जणांना मृत्यूच्या दारातून वापस देखील आणण्यात यश आले आहे. महिलांनी सिझेरियन प्रसूती  (cesarean operation) न घाबरता शासकीय रुग्णालयात प्रसूतीसाठी यावे, असे आवाहन जिल्हा शल्य चिकित्सकाकडून करण्यात आले आहे.  

    सुरक्षित मातृत्वासाठी राज्य सरकारच्या विविध योजना आहेत. रुग्णालयात होणाऱ्या प्रसूतीच्या प्रमाणात वाढ झाली, तरीही अतिदुर्गम भातात प्रसूती घरी होत असल्याची माहिती आहे. परंतु, घरगुती बाळंतपण करणे महागात पडू शकते. यामुळे बाळात आणि आईला देखील धोका पोहचू शकतो. पूर्वीच्या काळी आरोग्य विभागाकडे पाहिजे तेवढ्या अधिक सुविधा नव्हत्या आणि डॉक्टरांची संख्या देखील कमी असायची. महिलांची बाळंतपणे घरीच केली जायची. मात्र आता आधुनिकतेच्या काळामध्ये प्रत्येक गावामध्ये किंवा जिल्ह्यातील जिल्हा रुग्णालयामध्ये शासनाने प्रत्येक आरोग्य संस्थेत बाळंतपणे करण्याची सोय केली आहे.

    ग्रामीण भागातील महिला आजही सिझर करण्यास घाबरत. यामुळेच काही महिला घरच्या घरीच बाळंतपण करण्याचा निर्णय घेतात आणि यामुळेच महिलांचा जीव जाण्याची देखील शक्यता नाकारता येत नाही. महिलांनी घरीच बाळंतपण करण्याचा निर्णय न घेता न घाबरता थेट शासकीय रुग्णालयात संपर्क साधून किंवा जवळपास असणाऱ्या रुग्णालयातच जाऊन बाळंतपण करणे हे योग्य आहे.

    हेही वाचा- नर मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

    घरी प्रसूतीच्या 2 घटना

    घरच्या घरी प्रसूती करण्याचे प्रमाण मागील 15 ते 20 वर्षांपूर्वी अधिक होते. मात्र बीड सारख्या ग्रामीण भागात आजही काही प्रमाणात घरी प्रसूती केली जात आहेत. मागील पाच महिन्यांमध्ये घरगुती पद्धतीने प्रसूती करण्याच्या 2 घटना समोर आल्या आहेत. मात्र प्रसूती नंतर त्यांना जवळच्या शासकीय रुग्णालयात योग्य ते उपचार घेण्यासाठी दाखल करण्यात आले.

    1414 प्रसूती  नॉर्मल

    जिल्ह्यात मे ते जुलै 2022 या महिन्याची आकडेवारी घेतली असता 1 हजार 414  प्रसूती  ह्या नॉर्मल पद्धतीने झाल्या आहेत. तर 836 महिलांची सिझेरियन प्रसूती करण्यात आली आहे. सिझेरियन प्रसूती केल्याने देखील जिवाला कुठलाच धोका उद्भवू शकत नाही, असे वैद्यकीय तज्ञांनी सांगितले.

    हेही वाचा- ऐतिहासिक वारसा आणि दारूगोळ्याचे भंडार असलेला परांडा किल्ला

    बाळाला आणि आईच्या जिवाला धोका

    घरच्या घरीप्रसूती  केल्यास जास्त प्रमाणात रक्तस्राव होण्याची शक्यता असते आणि गुंतागुंती देखील होऊ शकते. यामुळेच बाळाला व बाळाच्या आईला धोका निर्माण होऊ शकतो. यासाठीच तज्ञ डॉक्टरांचे मार्गदर्शन आणि प्रसूती  करण्यासाठी जिल्ह्यातील शासकीय रुग्णालयातच प्रसूती  करा. नॉर्मल डिलिव्हरी किंवा सिझेरियन प्रसूती हे शासकीय संस्थेत किंवा प्राथमिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा रुग्णालय या ठिकाणी अगदी मोफत असून घरी प्रसूती  करण्याची चूक कुणीही करू नये. यामुळे बाळाला आणि आईच्या जिवाला धोका निर्माण होऊ शकतो आणि रक्तप्रवाह जास्त प्रमाणात होतो. त्यामुळे रुग्णालयातच प्रसूती  करावी, अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक सुरेश साबळे यांनी दिली.

    District Hospital, Beed

    गुगल मॅपवरून साभार

    "मी या ठिकाणी प्रसूती  करण्यासाठी दाखल झाले आहे. खाजगी दवाखान्यात जेवढ्या सुविधा उपलब्ध नाहीत तेवढ्या या शासकीय रुग्णालयात उपलब्ध आहेत. त्यामुळे महिलांनी घरी प्रसूती  करण्याचा प्रयत्न करू नये" असे प्रसूतीसाठी आलेली महिला अश्विनी यांनी सांगितले.

    First published:

    Tags: Beed, Beed news, बीड