मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /सीताफळांच्या जिल्ह्यात झाडांना धोका, पाहा का निर्माण झाली परिस्थिती? Video

सीताफळांच्या जिल्ह्यात झाडांना धोका, पाहा का निर्माण झाली परिस्थिती? Video

X
सीताफळांचा

सीताफळांचा जिल्हा म्हणून बीडची राज्यात ओळख आहे. पण, याच जिल्ह्यातील झाडांना धोका निर्माण झालाय.

सीताफळांचा जिल्हा म्हणून बीडची राज्यात ओळख आहे. पण, याच जिल्ह्यातील झाडांना धोका निर्माण झालाय.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Mumbai, India

  धनंजय दळवी, प्रतिनिधी

  मुंबई, 16 मार्च :  महाराष्ट्रातील कोरडवाहू भागात समृध्दी आणण्यासाठी सिताफळासारख्या पिकांच्या इंडस्ट्री उभ्या करण्यावर प्राधान्याने लक्ष द्यावे लागणार आहे. सिताफळाचा पल्प हे महाराष्ट्रातील एक मोठे औद्योगिक उत्पादन म्हणून समोर येऊ शकते. दर्जेदार पल्पिंग आणि फ्रोजनच्या यंत्रणा उभ्या राहणं, पल्पबरोबरच रबडी, आईसक्रिम, पावडर या उपपदार्थांचे चांगल्या पध्दतीने ब्रॅन्डींग करुन मार्केटींग करता येणे शक्य आहे.

  नवी मुंबईत सुरु असलेल्या प्रदर्शनात बीड जिल्ह्यातील महिलांनी सिताफळापासून बनवण्यात आलेल्या पदार्थांचा स्टॉल लावला होता. त्यावेळी त्यांनी बीड जिल्ह्यातील सीताफाळ उत्पादनावर चिंता व्यक्त केली आहे.

  लॉकडाऊनमध्ये सुचली कल्पना 'या' महिला बनवतात चक्क 21 प्रकारच्या शेवया, Video

  सीताफाळांचे कोठार

  बीड जिल्हा हा बालाघाट डोंगर रांगात वसलेला जिल्हा म्हणून ओळखला जातो. त्यामुळे या डोंगर रांगेवर आणि जिल्ह्यात गावरान सीताफळाची झाडे मोठ्या प्रमाणात दिसतात. याच डोंगरात असलेलं धारूर येथील कारी गावं नैसर्गिक सीताफळसाठी प्रसिध्द आहे. इथे पिकणाऱ्या सीताफळांना जीआय नामांकन देखील मिळाले आहे. दिवाळीनंतर दोन महिने येणाऱ्या या सीताफळाची आता बाजारपेठेत मागणी वाढली आहे. कारी गावातील महिलांनी आदर्श महिला ग्रामसंघाच्या अंतर्गत या सीताफळाचा गर, रबडी, आईसक्रिम, फ्रोजन पल्प इ. तयार करण्यास सुरुवात केली आहे.

  या महिला ग्रामसंघाच्या आशा पांचाळ यांनी दिलेल्या माहितीनुसार, 'बीड जिल्हा दुष्काळी भाग म्हणून प्रसिद्ध आहे मात्र त्यातही आमच्या इथे सीताफळाचे प्रमाण जास्त आहे. आजपर्यंत या सीताफळांची किंमत माहित नव्हती. लहानपणापासून बरीच सीताफळ पाहिली, खाल्ली होती पण त्याच महत्व लक्षात आलं नाही.

  Jalna News : नवा घोटाळा? जिल्ह्यात 331 टक्के वाढलं फळबाग क्षेत्र! पाहा काय आहे प्रकार, Video

  बचत गटाच्या बैठकीत विषय मांडण्यात आला की, या सीताफळ पासून भरपूर काही करू शकतो. नंतर उमेद अभियानाच्या अंतर्गत बरीच माहिती मिळाली. प्रशिक्षण देण्यात आले. त्यानंतर आम्ही यावर अभ्यास केला गावात फिरलो महिलांशी चर्चा केली. त्यानंतर सहा गाव निवडण्यात आली त्यात काही गावांमध्ये सीताफळांची झाड मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांच्याकडून सीताफळ गोळा केली जातात.

  उत्पादनात घट

  सुरुवातीला गावातील महिला  150 रुपयांच्या रोजगारावर शेतात काम करत होत्या. त्यामधूल अनेक महिलांना रोजगार मिळाला त्यांच्यामध्ये उत्सुकता वाढली. धारुर तालुका सीताफळांसाठी प्रसिद्ध आहे. मागील काही वर्षांपासून वृक्षतोडीमुळे सीताफळाच्या झाडांची संख्या कमी झाली आहे. 2020 साली जे सीताफळ मिळालं ते यावर्षी मिळालं नाही. मोठ्या प्रमाणात होणारी वृक्षतोड हे याचं कारण आहे, सरकारनं याकडं लक्ष द्यावं,' अशी मागणी पांचाळ यांनी केली.

  First published:
  top videos

   Tags: Beed, Local18, Local18 food, Mumbai