मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'इतर राज्याप्रमाणे आर्थिक मदत करा', राष्ट्रकुल पदकविजेत्या अविनाश साबळेंच्या आई-वडिलांची सरकारकडं मागणी

'इतर राज्याप्रमाणे आर्थिक मदत करा', राष्ट्रकुल पदकविजेत्या अविनाश साबळेंच्या आई-वडिलांची सरकारकडं मागणी

राष्ट्रकुल स्पर्धेत सिल्व्हर मेडल जिंकणाऱ्या अविनाश साबळेच्या (Avinash Sable) आई-वडिलांनी राज्य सरकारकडं आर्थिक मदतीची मागणी केली आहे. त्यांनी तसं पत्रच प्रशासनाला लिहलं आहे.

बीड, 19 ऑगस्ट : बीड जिल्ह्यातील शेतकऱ्याचा मुलगा अविनाश साबळेनं (Avinash Sable) राष्ट्रकुल स्पर्धेत इतिहास घडवत सिल्व्हर मेडल (Silver Medal in CWG 2022) पटकावले. अविनाशनं काही दिवसांपूर्वी बर्मिंगहममध्ये झालेल्या स्पर्धेत 3 हजार मीटर स्टीपलचेस स्पर्धेत 8.11.20 अशी वेळ नोंदवत मेडल पटकावले. देशासाठी ही ऐतिहासिक कामगिरी करणाऱ्या अविनाशच्या कुटुंबाला आर्थिक मदतीची गरज आहे. त्याच्या आई-वडिलांनी पत्र लिहून राज्य सरकारकडं तशी मागणी केलीय. या पत्रामध्ये त्यांनी इतर राज्यातील खेळाडूंना मिळालेल्या मदतीचा उल्लेख केला आहे. काय आहे पत्र? अविनाशचे वडील मुकुंद साबळे यांनी Local18 च्या प्रतिनिधीला बोलताना हे पत्र लिहिल्याच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे. मुकुंद साबळे यांच्यासह अविनाशच्या आई वैशाली साबळे, तसंच भाऊ योगेश साबळे यांनी हे पत्र सरकारला लिहिले आहे. हे पत्र News18 लोकमतला देखील मिळाले आहे. बीडच्या जिल्हाधिकाऱ्यांना त्यांनी हे पत्र लिहिले आहे. या पत्रात अविनाशनं बर्मिंगहममध्ये झालेल्या राष्ट्रकुल स्पर्धेत मेडल मिळवल्याचा उल्लेख करण्यात आलाय. त्याचबरोबर इतर राज्यांमध्ये पदकविजेत्या खेळाडूंना दिल्या जाणाऱ्या आर्थिक मदतीप्रमाणे अविनाशलाही मदत देण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे. इतर राज्यांमध्ये राष्ट्रकुल स्पर्धेत गोल्ड मेडल जिंकणाऱ्या खेळाडूंना 3 कोटी, सिल्व्हर मेडल जिंकलेल्या खेळाडूंना 2 कोटी तर ब्राँझ मेडल जिंकलेल्या खेळाडूंना 1 कोटी रक्कम देण्यात येत आहे, असा उल्लेख या पत्रामध्ये करण्यात आलाय. आंतरराष्ट्रीय खेळाडू असलेल्या अविनाशलाही प्रोत्साहन मिळावे म्हणून इतर राज्यांप्रमाणे मदत करावी अशी मागणी त्याच्या कुटुंबीयांनी या पत्रात केली आहे. भंगारातील साहित्यापासून बनविले देशी जुगाड; दुचाकीने चालणाऱ्या यंत्राची चर्चा तर होणारच! शिक्षणासाठी पायपीट 'अविनाश हा मूळचा बीड जिल्ह्यातील आष्टी तालुक्यातील मांडवा गावचा आहे.अविनाशची शाळा 5 ते 6 किमी दूर होती. इतर मुलं सायकलीने ये-जा करत. पण, आमची परिस्थिती बेताची असल्यानं त्याला सायकल घेणे शक्य नव्हते. त्यावेळी अविनाश चालत शाळेत जात असे.' अशी आठवण अविनाशच्या वडिलांनी त्याला राष्ट्रकुल स्पर्धेत पदक मिळाल्यानंतर सांगितली होती.
First published:

Tags: Beed, Beed news, Sports

पुढील बातम्या