बीड, 21 मार्च : देशाची प्रधानमंत्री स्त्री झाली, तुमची ताई होऊ शकत नाही का? या पंकजा मुंडेंच्या विधानाची सध्या चर्चा होतेय. परळी मतदारसंघात जल जीवन मिशन कामाच्या उद्घाटनावेळी त्या बोलत होत्या. स्त्री विकास करू शकत नाही का? पुरुषांनी दिले नाही तितके मी दिले. देशाची पंतप्रधान स्त्री होऊ शकते, तर मी होऊ शकत नाही का? असा प्रश्न पंकजा मुंडे यांनी विचारला.
पंकजा मुंडे या भाजपमध्ये नाराज असल्याच्या चर्चा आतापर्यंत अनेकदा झाल्या. त्यावर पक्षासह पंकजा मुंडे यांच्याकडूनही खुलासे झाले. पण आता पंतप्रधानपदावरून केलेल्या वक्तव्याने सर्वांच्या भुवया उंचवल्या आहेत. २०१९ च्या निवडणुकीत तुम्ही महिला असल्यानं आम्ही मत दिलं नाही असं शेजारच्या गावातले लोक म्हणाल्याचं पंकजा मुंडेंनी सांगितलं. माझं काही चुकलं का? माझ्यात काही खोट आहे का? तुम्ही साथ द्यायला पाहिजे असं भावनिक आवाहन पंकजा मुंडे यांनी केलं. २०२४ च्या तयारीला पंकजा मुंडे लागल्याचंच यातून दिसून येतंय.
संपकाळात आरोग्यसेवा बिघडली, नागपुरात मेयो-मेडिकलमध्ये 6 दिवसात 109 मृत्यू
महिला विकास करू शकत नाही का असा प्रश्न विचारताना पंकजा मुंडेंनी म्हटलं की, जितकं तुमच्या पुरुषांनी दिलं नाही, तेवढं ताईंनी दिलंय. तुम्ही रामायण ऐकता, महाभारत ऐकता, त्यात काय सांगतात? रामाला साथ द्या म्हटलं जातं का? तुम्ही एकजुटीने साथ द्या असं पंकजा मुंडे म्हणाल्या.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Pankaja munde