Home /News /maharashtra /

का गरज पडली पारधी समाजाला आपल्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची

का गरज पडली पारधी समाजाला आपल्या घरावर सीसीटीव्ही कॅमेरे लावण्याची

title=

असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे. ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. आणि हाच संशयाचा डाग कायमचा पुसून टाकण्यासाठी पारधी समाजातील एका तरुणानं समाजात सन्मानान जगता यावं म्हणून नामी शक्कल लढवली आहे. पाहुयात एक स्पेशल ?

पुढे वाचा ...
    असे म्हणतात की गुन्हेगारांना जात नसते, मात्र समाजात अशी एक जात आहे. ज्यांच्याकडे नेहमीच संशयाच्या नजरेनं पाहिलं जातं. आणि हाच संशयाचा डाग कायमचा पुसून टाकण्यासाठी पारधी समाजातील एका तरुणानं समाजात सन्मानान जगता यावं म्हणून नामी शक्कल लढवली आहे. पाहुयात एक स्पेशल रिपोर्ट...

    चारही बाजूने ओसाड डोंगर आणि त्यामध्ये असणार हे घर, हे घर एखाद्या सरपंच, ग्रामपंचायत सदस्य अथवा एखाद्या प्रतिष्ठित माणसाचे नाही. तर हे घर आहे एका पारधी कुटुंबाचं, गावात अथवा परिसरात एखादी घटना घडली की सर्वात आधी याच कुटुंबाला लक्ष केले जातं. मात्र आपण एखाद्या गुन्ह्यात सहभागी नसून निर्दोष आहोत. असं सिद्ध करण्यासाठी या कुटुंबातील या मुलाने घराच्या चारही बाजूला सीसीटीव्ही कॅमेरे बसवून घेतले आहेत. नेमकं काय कारण आहे. जेणेकरून हे कॅमेरे या ठिकाणी लावण्यात आलेत. ऐकुयात त्यांच्याच तोंडून.

    काळे कुटुंब थोडीफार असलेली शेती कसून आपला उदरनिर्वाह करते. तर शामल शिरूर इथल्या एका शाळेत दहावीच शिक्षण घेत आहे. त्याची शिक्षणाची मोठी जिद्द, चांगलं शिक्षण घेऊन मोठा अधिकारी बनण्याचं स्वप्न तो उराशी बाळगून आहे. मात्र वारंवार ज्या गुन्ह्यात सहभाग नाही. त्या गुन्ह्यात अडकवण्याचा प्रयत्न केला जात असल्याने हे कुटुंब पुरते हतबल झाले आहे.

    एखाद्या पारधी समाजाच्या घरावर बसवलेले सीसीटीव्ही कॅमेरे ही राज्यातील पहिलीच घटना म्हणावी लागेल. आम्हाला देखील समाजात इतरां प्रमाणे जगण्याचा अधिकार आहे. त्यामुळे आमच्या वर होणारे आरोप सिद्ध करण्यासाठी उचललेलं हे पाऊल असल्याचं भटके विमुक्त संघटनेचे समन्वयक अरुण जाधव सांगत आहेत.

    काळे कुटुंबाप्रमाणे समाजात असे अनेक कुटुंब आहेत. की जे केवळ समाजातील विकृत लोकामुळे यात अडकून पडली आहे. त्यामुळेच समाजाने देखील आपला दृष्टिकोन बदलून त्यांना स्वीकारण आता गरजेच आहे.

    First published:

    पुढील बातम्या