मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मळमळ होतंय म्हणाला, आरोपी पोलिसांना जोरात हिसका देऊन पळाला, बीडमधील धक्कादायक घटना

मळमळ होतंय म्हणाला, आरोपी पोलिसांना जोरात हिसका देऊन पळाला, बीडमधील धक्कादायक घटना

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटकेत असलेल्या दोन आरोपींनी पोलिसांना चकवा देत धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटकेत असलेल्या दोन आरोपींनी पोलिसांना चकवा देत धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.

बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटकेत असलेल्या दोन आरोपींनी पोलिसांना चकवा देत धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे.

बीड, 28 ऑगस्ट : बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. अटकेत असलेल्या दोन आरोपींनी पोलिसांना चकवा देत धूम ठोकल्याचा प्रकार समोर आला आहे. आरोपीने पोलिसांना मळमळ होतंय, उलटी येत असल्याचं सांगितलं होतं. त्यामुळे पोलिसांनी आरोपींना जेलमधून बाहेर काढलं होतं. यावेळी संधी मिळताच आरोपी पोलिसांना हिसका देत पळून गेले. आरोपींना यावेळी एका दुचाकी चालकाने देखील मदत केल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी या प्रकरणी अज्ञात दुचाकी चालकावरही गुन्हा दाखल केला आहे. पोलीस ठाण्यातून पळालेले आरोपी हे गुटखा तस्कर होते. या गुटखा तस्करी करणाऱ्या आरोपींना पोलिसांन अटक केली होती. पण आरोपींनी थेट पोलीस ठाण्यामधून धूम ठोकली. पोलिसांनी आठ लाखाचा गुटखा घेवून जाणारी मालवाहतूक जीप पकडली होती. पोलीस अधीक्षकांच्या विशेष पथकाने दोन आरोपींसह मुद्देमाल बीड पोलिसांच्या स्वाधीन केला होता. पण मळमळत होत असल्याचा बहाणा करुन दोन आरोपींनी पोलीस ठाण्यातून धूम ठोकली. काल रात्री साडेसात वाजता हा प्रकार घडला. शेख मोहसीन शेख सलाउद्दीन आणि शेख इकबाल शेख रशीद अशी आरोपींची नावे आहेत. (भूकंपासारखा हादरला संपूर्ण परिसर! 32 मजली ट्विट टॉवर जमीनदोस्त, पहिला EXCUSLIVE VIDEO)
पोलिसांनी बीड शहरातील बार्शी नाक्यावरून चोरी छुप्या मार्गे गुटाखा तस्करी करणारी जीप पकडून झडती घेतली होती. तेव्हा त्यात 8 लाख 82 हजार 250 रुपयांचा गुटखा आढळला. संबंधित पथकाने चार लाखांच्या जीपसह 12 लाख 82 हजार 250 रुपयांचा मुद्देमाल सायंकाळी सहा वाजता पोलिसांच्या स्वाधीन केला.
दरम्यान, ठाणे अंमलदार संजयकुमार राठोड यांनी दोन्ही आरोपींना बाकड्यावर बसवले. सायंकाळी साडेसहा वाजता शेख इकबाल याने उलट्या आणि मळमळ होत असल्याचे सांगितले. त्यामुळे ठाणे अंमलदार संजयकुमार राठोड यांनी त्यास बाहेर आणले. यावेळी हिसका देऊन तो पळाला. यावेळी शेख मोहसीननेही धूम ठोकली. दोघांनी एकामागोमाग एक पलायन केले. राठोड यांनी पाठलाग करण्याचा प्रयत्न केला. पण एका व्यक्तीच्या दुचाकीवरुन ते पळून गेले. संजयकुमार राठोड यांच्या फिर्यादीवरुन पळून गेलेल्या दोन आरोपींसह त्यांना मदत करणावरून अज्ञात दुचाकीस्वारावर गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
First published:

Tags: Beed, Beed news, Crime

पुढील बातम्या