मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : दोन वर्षापासून सिग्नल यंत्रणा धुळखात; वाहनचालकांचा जीव मुठीत धरून प्रवास, VIDEO

Beed : दोन वर्षापासून सिग्नल यंत्रणा धुळखात; वाहनचालकांचा जीव मुठीत धरून प्रवास, VIDEO

दोन वर्षांपासून मुख्य चौकातील सिग्नल बंद असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेकडे निधीच नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे.

बीड, 12 ऑगस्ट :  वाहनांचा वेग कमी करणे, अपघातांवर नियंत्रण आणणे आणि वाहतूक सुरळीत करण्यासाठी शहरात बसविण्यात आलेल्या ट्रॅफिक सिग्नलची (traffic signal) अवस्था बिकट आहे. गेल्या दोन वर्षांपासून मुख्य चौकातील सिग्नल बंद असल्याची परिस्थिती आहे. त्यामुळे वाहनचालकांना त्रास सहन करावा लागत आहे. यंत्रणा सुरळीत करण्यासाठी नगर परिषदेकडे निधीच नसल्याचे अधिकाऱ्यांकडून सांगण्यात येत आहे. मात्र, या विस्कळीत वाहतुकीमुळे अपघात झाला तर जबाबदार कोण असेल, असा संतप्त सवाल नागरिकांनी केला आहे. शहरात रस्ते, स्वच्छता, सिग्नल, सीसीटीव्ही कॅमेरे याची जबाबदारी नगरपरिषदेची आहे. मात्र, शहरातील मुख्य चौकात सिग्नल यंत्रणा बंद असल्याचे शहरातील वाहतूक विस्कळीत झाली आहे. वाहनचालकांना नाहक त्रास सहन करावा लागत असून अपघाताची शक्यता देखील नाकारता येत नाही. नगरपरिषदेने शहरात लाखो रुपये खर्च करून सिग्नल व्यवस्था सुरळीत केली होती. परंतु मागील दोन वर्षापासून सिग्नल व्यवस्था बंद असून धुळखात उभी आहे. या मुख्य चौकातील सिग्नल बंद शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात 4 सिग्नल, अण्णाभाऊ साठे चौकात 3, सुभाष रोड भाजी मंडी परिसरात 4, तर नगर रोड परिसरात 4 सिग्नल आहेत. मात्र, हे सर्वच सिग्नल बंद असल्याने शोभेची वस्तू बनले आहेत. हेही वाचा- दुष्काळी भागात फुलवली ‘फळबाग’; आता शेतीतून लाखोंची कमाई, पाहा VIDEO सिग्नल नसल्याने वाहने सुसाट सिग्नल नसल्याने वाहने सुसाट धावत आहेत. काही मुख्य रस्त्यालगत शाळा, महाविद्यालये, बाजारपेठ आहेत. रस्त्यावर नेहमीच प्रवाशांची वर्दळ असते. मात्र, अशा वर्दळीच्या ठिकाणी देखील सुसाट वाहन चालवली जात असल्याने इतर वाहनचालकांचा जीव धोक्यात आला आहे. सुसाट वाहने चालवणाऱ्यांना सिग्नल सुरू नसल्यामुळे कुठलाच धाक राहिलेला नाही. निधी नसल्याने सिग्नल यंत्रणा निकामी शहरातील सिग्नलची दुरुस्ती, देखभाल नगरपरिषदेला करावी लागते. मात्र, निधी नसल्याने सिग्नल यंत्रणा निकामी झाली आहे. याचा त्रास शहरातून वावरणाऱ्या नागरिकांना सहन करावा लागत आहे. कोणत्याही क्षणी कुठल्याही बाजूने मोटरसायकल येतात. यामुळे जीव मुठीत धरून प्रवास करण्याची वेळ नागरिकांवर आली आहे. माझा दोनदा किरकोळ अपघात सुभाष रोडने रोज शाळेत जातो. मात्र, परिसरातील सिग्नल बंद आहेत. या परिसरात ट्राफिक जाम होते. माझा दोनदा किरकोळ अपघात देखील झाला असल्याचे विद्यार्थी मनीष आहेर याने सांगितले. हेही वाचा- उस्मानाबादी रसदार गुलाबजाम, पाहताच तोंडाला सुटेल पाणी वाहतुकीला शिस्त राहिली नाही मुख्य बाजारपेठ परिसरातील अण्णाभाऊ साठे चौकात सिग्नल बंद असल्याने वाहतूक कोंडीचा सामना करावा लागतो. वाहतुकीला कुठलीही शिस्त राहिलेली नाही. प्रशासनाने लवकरात लवकर सिग्नल यंत्रणा दुरूस्त करावी, अशी मागणी स्थानिक नागरिक किशोर काकडे यांनी केली आहे. शहरातील सिग्नल सुरू करणे गरजेचे असून यासाठी नगरपरिषदेला पत्रव्यवहार केला आहे. यासह प्रमुख मार्केटमध्ये पार्किंगची व्यवस्था सुरळीत करावी यासाठी नगरपरिषद कळवले असल्याचे बीड जिल्हा वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले आहे.
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या