बीड, 20 जानेवारी : वातावरणातील किंवा खाण्यातील बदलामुळे सामान्यपणे आजार म्हटलं तर सर्दी, ताप, खोकला आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे. मात्र आता मोबाईलच्या वापरातून देखील आजार होत असल्याचे समोर आलं आहे. स्मार्टफोनचा वापरातून टेक्स्ट नेक सिंड्रोम नावाचा आजार होत आहे. बीडमधील अनेकजण या आजाराचे शिकार झाले आहेत.
किशोरवयीन पासून ते मोठ्यांपर्यंत सर्वांच्या हातामध्ये सध्या स्मार्टफोन फोन दिसत आहेत. कोरोना काळापासून मोबाईलच्या वापर अधिक वाढला आहे. मात्र तासंतास मोबाईलचा वापर करणे धोकादायक असल्याचे समोर आलं आहे. मोबाईलच्या वापरातून अनेक दुष्परिणाम होत आहे. बीडमध्ये टेक्स्ट नेक सिंड्रोम नावाच्या आजाराने अनेकजण ग्रासले आहेत.
सध्याच्या काळात मोबाईल जीवनावश्यक वस्तूपैकी एक झाली आहे. कोरोना काळात विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात ऑनलाईन क्लास सुरू झाले. तासंतास मोबाईलचा वापर वाढत गेला. तेव्हापासूनच टेक्स स्नेक सिंड्रोम नावाचा आजार वाढला आहे. यासह कॉम्प्युटर आणि वेगवेगळ्या गॅजेटच्या अधिक वापरातून देखील या आजाराच्या समस्या उद्भवू लागल्या आहेत.
बीडमधील अस्थिरोग डॉ.प्रमोद शिंदे यांच्या माहितीनुसार त्यांच्याकडे येणाऱ्या रुग्णापैकी जवळपास 50 टक्के रुग्णांना टेक्स नेक सिंड्रोम आजार जडलेला आहे. त्यामुळे मोबाईलचा वापर कामापुरता केला तरच योग्य आहे.
कोणत्याही प्रकारचा तणाव वाढलाय? 'या' नंबरवर कॉल करा आणि व्हा टेन्शन फ्री, Video
काय आहे नेक सिंड्रोम आजार?
मोबाईलचा वापर करताना आपण नेहमी मोबाईल डोळ्याच्या सरळ रेषेत धरत नाही. आपल्या हातामध्ये मोबाईल असल्यामुळे नेहमी मान खाली वाकून मोबाईल पाहतो. रील्स, पिक्चर, मालिकाही, मोबाईलवर पाहतो. सतत मान खाली राहिल्याने मानेच्या स्नायूच्या नैसर्गिक रचनेवर ताण येतो. मान दुखू लागते यातूनच टेक्स्ट सिंड्रोम होतो. मोबाईल वापरताना तो डोळ्याच्या सरळ रेषेत ठेवूनच पहावा, तासंतास मोबाईल वापरत असाल तर मध्ये वीस ते तीस मिनिटांचा ब्रेक घ्यावा.
आजाराची लक्षणे?
हाताला मुंग्या येणे, मान दुखणे, खांदे भरून येणे, अशी प्रमुख लक्षणे ही टेक्स नेक सिंड्रेम आजारारीची लक्षणे आहेत. अशी लक्षणे आढळल्यास वेळीच तज्ञाचा सल्ला घेणे आवश्यक आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Health Tips, Local18