मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : बीडमध्ये वर्षभरात 350 लहान मुलांचा मृत्यू, पाहा काय आहेत कारणं

Video : बीडमध्ये वर्षभरात 350 लहान मुलांचा मृत्यू, पाहा काय आहेत कारणं

X
low

low birth weight cases increasing

बालमृत्यूचे प्रमाण कमी होताना दिसत नाही. बीड जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 350 बालमृत्यू झाले आहेत.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 23 जानेवारी : बालमृत्यूचे प्रमाण नियंत्रणात राहावे यासाठी सरकारदरबारी वेगवेगळ्या योजनांचा भडिमार सुरू आहे. मात्र, कधी जन्मत: व्यंग, लो बर्थ वेट, जंतुसंसर्ग, अशा वेगवेगळ्या कारणांमुळे शून्य ते पाच वयोगटातील बालकांना मृत्यूला सामोरे जावे लागत आहे. गरोदरपणामध्ये योग्य ती काळजी न घेतल्यास बालकांच्या मृत्यू होण्याची शक्यता नाकारता येत नाही. बीड  जिल्ह्यात गेल्या वर्षभरात 350 बालमृत्यू झाले आहेत.

मातृत्वाच्या आनंदाचा परमोच्च क्षण म्हणजे गर्भावस्थेची नऊ महिने पूर्ण झाले की होणारा बाळाचा जन्म होय. मात्र, मोठ्या आशेने व काळजीने पोटात सांभाळ केलेल्या बाळाचा जन्म दुर्दैवाने काही मातांसाठी अवघ्या काही क्षणांचा ठरला आहे. गेल्या वर्षभरात बीडमध्ये 350 बालमृत्यू झाले आहेत.

बालमृत्यूचे प्रमाण कमी व्हावे यासाठी शासन दरबारी वेगवेगळ्या योजनांचा भडिमार आणि कोट्यवधींचा निधी खर्च केला जातो, अंमलबजावणी केली जाते. मात्र, असे होत असताना बालमृत्यूच प्रमाण कमी होताना दिसत नाही. 

महिलांनी गरोदरपणामध्ये सकस आहार पालेभाजी, नियमित व्यायाम, नऊ महिने अगोदरच कळा सुरू झाल्यास तर डॉक्टरांचा सल्ला, संसर्गजन्य आजार असल्यास त्यावर उपचार करावा,  जन्मता बाळाला अर्धा तासाने स्तनपान व सहा महिन्याने निव्वळ स्तनपान केले तर रोग प्रतिकार शक्ती चांगली राहते.

मुलांच्या वजनात घट

शून्य ते पाच वर्ष वयोगटातील लो बर्थ वेट हे बालमृत्यूचे कारण अनेक विकसित देशाप्रमाणे भारत सारख्या विकसनशील देशात देखील बघायला मिळत आहे. बाळ पोटात असताना मातेला होणारे आजार संक्रमण तसेच मातेचे पोषण प्रसूती काळात कसे होते, हे देखील बघणे गरजेचे असते. माता जर कमी वजनाची असेल तर यामुळे देखील मुलांचे वजनात घट होऊ शकते.  

Wardha : पालकांनो, मुलांची काळजी घ्या! न्युमोनिया, डायरियाचा धोका वाढला

योग्य आहार महत्त्वाचा

बाळ जन्मल्यानंतर आईचे दूध हे एकमात्र खाद्य अत्यंत आवश्यक आहे. पुढे बाळ सहा महिन्याचे झाल्यानंतर आहार म्हणून ज्याला आपण सप्लीमेंट्री आहार म्हणतो ते पूरक योग्य प्रमाणात देणे अतिशय गरजेचं असतं अन्यथा अतिसार, उलट्या यासारखे आजार या दरम्यान होऊ शकतात. तसेच नेहमी सर्दी खोकला सारख्या आजारामुळे बाळाची रोगप्रतिकारकशक्ती कमी होऊन इतर आजारामध्ये बाळाचा मृत्यू होऊ शकतो. हे सर्वसाधारणतः शून्य ते पाच वर्ष वयोगटातील बालमृत्यूची कारणे आहेत. 

First published:

Tags: Beed, Health, Local18