बीड, 30 जानेवारी : इच्छाशक्ती असेल तर माणूस यशाच्या शिखरापर्यंत नक्की पोहोचतो. सध्याच्या काळामध्ये उच्चशिक्षित, घेणाऱ्या तरुणांची संख्या मोठी आहे. मात्र, यात सर्वांनाच नोकरी मिळवणं कठीण जातं. परंतु, नोकरी मिळत नाही म्हणून खचून न जाता बीड मधील एका तरुणाने स्वत:चा व्यवसाय सुरू केला आहे.
बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये 2020 रोजी अरबाज शेखने स्वत:चा हाॅटेल व्यवसाय सुरू केला. अरबाजने बीडमध्ये दाबेलीचा व्यवसाय सुरू केला असून या व्यवसायात त्याचा भाऊ आयाजने हातभार लावला. दोघांच्या मेहनतीने व्यवसाय चांगला चालत आहे.
व्यवसायाची भरभराटी
अरबाजने बीएससी, पर्यंतचे शिक्षण पूर्ण केलं आहे. त्याने अनेक ठिकाणी नोकरी मिळावी यासाठी प्रयत्न देखील केले. मात्र त्याला नोकरी मिळाली नाही. यातून खचून न जाता अरबाजने स्वत:चा व्यवसाय उभारला. आता याच व्यवसायाने भरभराटी घेतली आहे.
1200 दाबेलीची विक्री
संध्याकाळी 4 ते 10 या वेळात दाबेलीची विक्री केली जाते. घरगुती मसाले यावर लावण्यात येणारा बटर आणि यासोबतच असणारी तिखट चटणी यामुळे दाबेली अधिकच चवदार लागते. 20 रुपयापासून या दाबेलीच्या विक्रीला सुरुवात केली. ग्राहकांना देखील याची चव आवडली आहे. आता एका दिवसाला अकराशे ते बाराशे दाबेलीची विक्री होते.
रोजच्या जेवणात येईल खास चव, पाहा फेमस शिपी आमटीचा Recipe Video
लाखोंची कमाई
अरबाजने नोकरी मिळत नाही म्हणून हतबल न होता स्वतःचा व्यवसाय सुरू केला. त्यामुळे आता या व्यवसायात त्याचा दम बसला असून एखादा सरकारी कर्मचारी जेवढा महिन्याकाठी पगार मिळतो तेवढेच नफा अरबाजला मिळत आहे. त्यामुळे नोकरीच्या मागे न लागता देखील आयुष्यात खूप काही करता येतं हेच असबाजने दाखवून दिलं आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Local Food, Local18