बीड, 9 जानेवारी : स्ट्रीट फूडच्या बाबतीत बीड देखील आता मागे राहिले नाही. बीडमध्ये काही असे स्ट्रीट फूड मिळतील जे पाहताच तुम्ही स्वतःला खाण्यापासून थांबवू शकणार नाही. त्यातील एक फेमस स्ट्रीट फूड म्हणजे फाफडा. मूळची गुजराती डिश असलेला फाफडा देशभर प्रसिद्ध आहे. मात्र त्याची चव बीडमध्ये देखील चाखायला मिळत असल्याने खवय्ये आवडीने आस्वाद घेत आहेत.
शहरात अनेक असे ठिकाणी असतात की त्या ठिकाणी चवदार खाद्यपदार्थ मिळतात. फाफडा हे खाद्यपदार्थ जरी गुजरात राज्यातला असला तरी आता अनेक ठिकाणी आवडीने खाल्ला जात आहे. बीड शहरात देखील एका ठिकाणी गरमागरम कुरकुरीत फाफडा उपलब्ध झाला आहे. बीड शहरातील स्टेडियम रोड परिसरामध्ये किशोर शर्मा यांनी 1990 च्या सुमारास एका छोट्याशा दुकानांमध्ये स्वीट मार्टचा व्यवसाय सुरू केला.
त्यावेळी गुजरातमध्ये आवडीने खाल्ला जाणारा फाफडा या पदार्थाविषयी बीड मधील लोकांना माहिती नव्हती. शहरांमध्ये प्रथमच हा पदार्थ खवय्यांच्या नजरेत पडला. त्यावेळी 5 रुपये प्लेट पासून शर्मा यांनी फाफड्याची विक्री सुरू केली. आता फाफडाच्या प्लेटची किंमत 20 रुपये इतकी झाली आहे.
पीठ मळण्याची कला
सकाळी दहाच्या सुमारास शर्मा स्वीट होम सुरू होते. मात्र, संध्याकाळी साडेसहा ते आठच्या दरम्यानच फाफड्याची विक्री केली जाते. बेसन पीठ, ओवा, बेकिंग सोडा आणि मीठ यापासून फाफड्याच्या पिठाचे मिश्रण तयार केले जाते. हे पीठ मळण्याची एक वेगळी कला आहे.
Beed : शाळेच्या परिसरात विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ! प्रशासन अजूनही साखर झोपेत
80 प्लेटची विक्री
ज्यावेळी बीड शहरात पहिल्यांदी फाफडा आला त्यावेळी दिवसाकाठी 30 ते 40 प्लेटची विक्री होत होती. मात्र आज 70 ते 80 प्लेटची विक्री होत आहे. दोन तासांमध्ये आठ किलो फाफड्याची विक्री होते. पूर्वी अडीचशे रुपये किलो मिळणारा फाफडा आज साडेचारशे रुपये किलो पर्यंत पोहोचला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, Local Food, Local18