मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : रोजच्या आहारातील मसाल्यांना महागाईचा ठसका! 30 टक्क्यांनी वाढले भाव

Video : रोजच्या आहारातील मसाल्यांना महागाईचा ठसका! 30 टक्क्यांनी वाढले भाव

X
Spices

Spices Prices increased

बाजारात मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 23 जानेवारी : चवदार पदार्थांसाठी मसाल्याचे महत्त्व अधिक आहे. बाजारात विविध कंपन्यांचे पॅकेट बंद मसाले ग्राहकांसाठी उपलब्ध आहेत. मात्र, ग्रामीण भागात आजही सर्व मसाले घरगुती पद्धतीने तयार केली जातात. परंतु, सध्या बीडमधील बाजारात मसाला तयार करण्यासाठी लागणाऱ्या साहित्याच्या किमतीत कमालीची वाढ झाली आहे.

तोंडाची चव वाढविणारे आणि आयुर्वेदिकदृष्ट्या शरीराला गरजेचे असलेल्या मसाल्याच्या दरात मागील काही दिवसांपासून सातत्याने वाढ होत आहे. या वाढल्या महागाईमुळे गृहिणींचे आर्थिक गणित कोलमडले आहे.

30 टक्क्यांनी दर वाढले

सध्या महागाईच्या काळामध्ये सर्वच गोष्टींचे दर दिवसागणिक वाढू लागले आहेत. मसाल्याच्या दरामध्ये देखील मोठी वाढ झाली आहे. बीडमध्ये सध्या सर्वच मसाल्यांच्या दरात तेजी असल्यामुळे सर्वसामान्यांना मसाला खाणे कठीण झाले आहे. मागील तीन महिन्यांत मसाल्याच्या भावामध्ये 30 टक्क्यांनी वाढ झाली आहे.

वाढलेलं दर

धने पूर्वी 120 रुपये किलो होते आता 160 रुपये दर आहे आणि मिरची बनवण्यासाठी महत्त्वाचे घटक म्हणजे रामपत्री पूर्वी, 800 रुपये किलो होता आता 1000  रुपये किलो झाला आहे. यासह अनेक मसाला बनवणाऱ्यांच्या घटकांमध्ये वाढ झाली आहे.

 Pune : स्वस्तात मस्त पर्स मिळण्याची जागा, तरुणींसाठी आहे हक्काचं ठिकाण! Video

काळ्या मसाल्याचेही दर वाढले

लाल तिखट 220 ते  260 रुपये किलो होते मात्र याचा दर आता 370 रुपये प्रति किलो झाला आहे. काळ्या मसाल्याच्या भावामध्ये देखील मोठी वाढ झाली असून पूर्वी 380 ते  450 प्रति किलोचे दर आता 500 ते 600 प्रतिकिलो झाले आहेत.

First published:

Tags: Beed, Local18