मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भरधाव कार ट्रॅक्टरवर आदळली, 3 जणांचा मृत्यू

अंबाजोगाई-लातूर महामार्गावर भरधाव कार ट्रॅक्टरवर आदळली, 3 जणांचा मृत्यू

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 22 डिसेंबर : बीड जिल्ह्यातून अपघाताची दुर्दैवी बातमी समोर आली आहे. अंबाजोगाई-लातूर महामार्गावर कार आणि ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरचा भीषण अपघात झाला आहे. या अपघातात तिघांचा मृत्यू झाला आहे. तर पोखरी फाटा इथं आणखी एक अपघाताची घटना घडली असून 5 जण जखमी झाले आहे.

बीड जिल्ह्यातील अंबाजोगाई-लातूर महामार्गावर अपघाताची मालिका थांबायचं नाव घेत नाही. रात्री झालेल्या दोन अपघातात तिघांचा मृत्यू आणि पाच जण गंभीर जखमी झाले आहेत. बर्दापूरजवळ रस्त्याच्या कडेला उभा असलेल्या उसाच्या ट्रॅक्टरवर भरधाव कार आदळली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये कारचा चुराडा झाला. या अपघातात 3 जणांचा मृत्यू झाला आहे.

(स्कूल बसला ओव्हरटेक करणे जीवावर; पिंपरी चिंचवडमध्ये अपघाताचा भयानक Video समोर)

अपघातात मृत पावलेले तिघेही रेणापूर येथील आहेत. बबन प्रभू राठोड (वय ४५, बिटरगाव, ता. रेणापूर), नंदू माणिक राठोड (वय ३३, बिटरगाव, ता. रेणापूर), राहुल सुधाकर मुंडे (वय ३१, वंजारवाडी, ता. रेणापूर) अशी तिघा मयतांची नाव आहे. हे दोन्ही अपघात एकाच रस्त्यावर एक तासाच्या फरकांनी झाले असून ऊसाच्या ट्रॅक्टरला रिफलेक्टर नसल्याने हा अपघात झाल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.

(शिक्षक आहे की सैतान? 10 वर्षीय विद्यार्थ्याला बेदम मारहाण करत पहिल्या मजल्यावरुन फेकलं; आईसोबतही..)

तर, दुसरा अपघात महामार्गावरिल पोखरी फाटा येथे टेम्पो, कार आणि ऊसाच्या ट्रॅक्टरचा अपघात झाला. या अपघातात पाच जण जखमी झाले त्यांच्यावर अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ ग्रामीण शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

First published:
top videos

    Tags: Marathi news