मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Beed : कोरोना काळातही चालली आयुर्वेदाची मात्रा, 1 लाख रुग्णांवर झाले उपचार! Video

Beed : कोरोना काळातही चालली आयुर्वेदाची मात्रा, 1 लाख रुग्णांवर झाले उपचार! Video

X
Ayurvedic

Ayurvedic treatment beed

कोरोना काळापासून आयुर्वेद उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल अधिक वाढला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 25 जानेवारी :  आधुनिक वैद्यकीय उपचार पद्धतीचा उगम अलीकडचा असला तरी आयुर्वेद विज्ञानाचा प्रवास हजारो वर्षांपासूनचा आहे. दोन्ही चिकित्सा पद्धतीचे स्वतंत्र महत्त्व आहे. मात्र, कोरोना काळापासून आयुर्वेद उपचार पद्धतीकडे रुग्णांचा कल अधिक वाढला आहे. बीड  जिल्ह्यात कोरोना काळात आयुर्वेदिक उपचार पद्धती गुणकारी ठरली आहे. 

भारतीय संस्कृती परंपरेत जडीबुटीचा वापर करून आजारांवर उपचार केले जायचे. महाबली हनुमानाने द्रोणागिरी पर्वतावरील संजीवनी बुटी आणल्याचा उल्लेख रामायणात आहे. आयुर्वेदाला प्राचीन परंपरा आहे. मधल्या काळात आपण आयुर्वेदिक उपचार पद्धतीला नजरेआड करत गेलो. मात्र, कोरोना काळात अनेकांना आयुर्वेदिक औषधीने तारले.

Video : बीडमध्ये वर्षभरात 350 लहान मुलांचा मृत्यू, पाहा काय आहेत कारणं

आजारांसाठी ऍलोपॅथिक, आयुर्वेदिक, होमिओपॅथिक, युनानी अशा उपचारपद्धती व शाखांचाचा वापर केला जातो. आयुर्वेदिक प्राचीन परंपरा, इतिहास आहे. आपल्या परिसरात उपलब्ध होणाऱ्या वनस्पतीचा आजार बरे करण्याची किमया आयुर्वेदमध्ये आहे.

कोरोना काळात आयुर्वेदिक उपचार

बीड जिल्ह्यामध्ये कोरोना महामारीनंतर आयुर्वेदिक, उपचार घेण्याकडे रुग्णांचा अधिक कल असल्याचे समोर आले आहे. 2021 साली संपूर्ण जिल्ह्यात, 90 हजार रुग्णांनी आयुर्वेदिक, उपचार घेतले आहेत. तर 2022 मध्ये 1 लाख पेक्षा अधिक रुग्णांनी आयुर्वेदिक पद्धतीने उपचार घेतले असल्याचे आकडेवारी समोर आली आहे.

कोरोना काळामध्ये आयुर्वेदिक, उपचाराने अनेकांना तारले. या काळामध्ये काढ्याचा अधिक उपयोग झाला. ऍलोपॅथिक उपचार घेणारा रुग्ण लवकर बरा होतो. मात्र, याचे साईड इफेक्ट देखील आहेत. त्यामुळे अनेकजण आयुर्वेदिक उपचार घेतायत.

कॅन्सरवरील औषधं कार्यक्षम करण्याचा कोल्हापूरच्या शास्त्रज्ञांनी शोधला फॉर्म्युला

या आजारांवर उपचार

हेअर फॉल होणे, केसाचे आजार, कायमस्वरूपी सर्दी, खोकला, एलर्जी, दमा, पंचकर्म, यासारख्या अनेक आजारांवर आयुर्वेदिक पद्धतीने उपचार केले जातात.

कोरोना महामारी नंतर जिल्ह्यात अनेक रुग्ण आयुर्वेदिक उपचार घेत आहेत, यामध्ये वर्षाकाठी आकडेवारी वाढत असल्याची माहिती सहाय्यक जिल्हा, आयुष अधिकारी आनंद कुलकर्णी यांनी दिली.

First published:

Tags: Beed, Health, Local18