मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : भट्टीवरचा स्पेशल शेवगा फ्राय, झणझणीत भाजीवर खवय्यांचा ताव!

Video : भट्टीवरचा स्पेशल शेवगा फ्राय, झणझणीत भाजीवर खवय्यांचा ताव!

X
बीडमधील

बीडमधील कर्डिले मामा यांच्या हॉटेल समाधानमधील शेवगा फ्राय डिश फेमस आहे. शेवगा फ्राय खाण्यासाठी परिसरातील नागरिक या ठिकाणी आवर्जून येतात.

बीडमधील कर्डिले मामा यांच्या हॉटेल समाधानमधील शेवगा फ्राय डिश फेमस आहे. शेवगा फ्राय खाण्यासाठी परिसरातील नागरिक या ठिकाणी आवर्जून येतात.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  बीड, 04 नोव्हेंबर : बीड  जिल्ह्यात असे काही ठिकाणं आहेत. ज्या ठिकाणी चविष्ट पदार्थ खाण्यासाठी खवय्ये नेहमी गर्दी करत असतात. बीड सारख्या ग्रामीण भागात तिखट पदार्थाची अधिक मागणी आहे. यातच जिल्ह्यामध्ये एक असं ठिकाण आहे तिथल्या शेवगा फ्रायची आस्वाद घेण्यासाठी प्रत्येकाची इच्छा होते.

  महाराष्ट्रातील प्रत्येक गाव शहरात खवय्यांसाठी काही स्पेशल ठिकाणं असतात. मागील 20 वर्षापासून बीडमधील कर्डिले मामा यांच्या हॉटेल समाधानमधील शेवगा फ्राय डिश फेमस आहे. शेवगा फ्राय खाण्यासाठी परिसरातील नागरिक या ठिकाणी आवर्जून येतात. कर्डिले मामा यांनी1999 मध्ये माजलगाव येथील सिंदफणा नदीच्या परिसरात हॉटेलच्या व्यवसायाला सुरुवात केली. सुरुवातीला हॉटेल व्यवसायात ते नवीन असल्यामुळे हॉटेल चालेल का नाही, याची शंका होती. मात्र त्यांच्या हाताला असणारी चव भारी होती. खवय्यांकडून येथील शेवगा फ्रायला चांगलीच पसंती मिळाली. 

  Video : निसर्गरम्य वातावरणात बसण्यासाठी खाट, 'नेप्ती'च्या भेळचा आहे भारीच थाट!

  घरगुती मसाले

  महागाईच्या काळात शेवगा फ्राय प्लेटची किंमत दीडशे रुपयांपर्यंत पोहोचली आहे. समाधान हॉटेलमध्ये मिळणाऱ्या शेवगा फ्रायमध्ये घरगुती लसणाची पेस्ट आणि मसालेदार पदार्थ, शेगदाण्याचे कुठ, कोथिंबीर, कांदा आणि लिंबामुळे या डिशला अप्रतिम स्वाद प्राप्त होतो. सुरुवातीला हॉटेल व्यवसाय सुरू केल्यानंतर दिवसासाठी 3 ते 4 प्लेट विक्री होत होती. मात्र आता दिवसाकाठी 100 प्लेटहून अधिक विक्री होते. 

  गुणवत्ता कायम राखली

  हॉटेल सुरू केलं तेव्हा शेवगा फ्राय प्लेटची किंमत केवळ 50 रुपये होती. आमच्या हाताला असणाऱ्या चवीमुळे व्यवसायाची उन्नती झाली. खवय्ये आवडीने शेवगा फ्रायचा आस्वाद घेतात. संध्याकाळी सात वाजल्यापासून ते रात्री 11  वाजेपर्यंत खवय्यांची या ठिकाणी मोठी गर्दी होते. 20 वर्षांमध्ये आम्ही चांगल्या दर्जाचे पदार्थ वापरले आहेत.  त्यामुळे वारंवार ग्राहक आवर्जून आमच्या हॉटेलमध्ये येतात, असे कर्डिले मामा यांनी सांगितले. 

  First published:

  Tags: Beed, Local18, Local18 food, बीड