मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ कुठंय माहिती आहे का?; जिथं 'विक्रमादित्य राजाला चालवावा लागला अडीच वर्षे तेलाचा घाणा'

Beed : साडेतीन पीठापैकी अर्धेपीठ कुठंय माहिती आहे का?; जिथं 'विक्रमादित्य राजाला चालवावा लागला अडीच वर्षे तेलाचा घाणा'

X
शनि

शनि देवस्थान

दर शनी अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात विशेष म्हणजे स्वयंभू मूर्ती असून त्याचे धार्मिक महत्त्व अधिक आहे.

    बीड, 23 जुलै :  बीड शहराला ऐतिहासिक आणि धार्मिक (Historical and religious) वारसा लाभलेला आहे.  या ठिकाणच्या खुणा आजही इतिहासाची साक्ष देतात. उज्जैन, नांदगाव, राक्षसभुवन हे तीन आणि बीडमधील शनी देवस्थान (Shani Mandir Beed) अर्धे असे साडेतीन पीठ आहेत. विक्रमादित्य राजाच्या (King Vikramaditya) काळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे. जागृत देवस्थान म्हणून मंदिराची ख्याती पसरत आहे. देशभरातून भाविक इथे दर्शनासाठी येतात.

    शनी ही न्यायाची देवता आहे. माणसाच्या चांगल्या आणि चुकीच्या कर्माची फळे व शिक्षा शनी देवता देते. उज्जैन विक्रमादित्य राजाच्या कार्यकाळापासून हे मंदिर अस्तित्वात असल्याची आख्यायिका आहे. बीड शहराला पूर्वी तामनिदा असे नाव होते. शनी मंदिर परिसराला शनीबाग म्हणून ओळखत जाते. विक्रमादित्य राजाच्या मागे साडेसात वर्ष शनीचे ग्रहमान असल्याने त्यांचे सर्व राजवैभव निघून गेले होते. राजाने अडीच वर्ष याच मंदिरात तेलाचा घाणा चालवला होता. अडीच वर्षातील शेवटच्या दिवशी शनी महाराजांनी स्वतः प्रगट होऊन विक्रमादित्य राज्याला दर्शन दिले. आणि त्यांचे सर्व वैभव परत दिल्याची आख्यायिका सांगितली जाते, अशी माहिती शनी मंदिर अध्यक्ष रामनाथ खोड यांनी दिली.

    हेही वाचा- Osmanabad : सोयाबीन पिकावर गोगलगायींचे अतिक्रमण; डोळ्यादेखत कोवळी पिके फस्त

    ऐतिहासिक काळात शहरातून वाहणाऱ्या बिंदुसरा नदीचे पात्र शनी देवस्थानापर्यंत होते, असे इतिहासकार सांगतात. जशी जशी लोकसंख्या वाढत गेली तशी मंदिर आणि बिंदुसरा पात्राच्या मध्ये वस्ती वाढली. एक जागृत देवस्थान म्हणून ख्याती पसरत असल्यामुळे येणाऱ्या भाविकांची संख्याही दिवसेंदिवस वाढत चालली आहे 

    या ठिकाणी दर शनी अमावस्येला मोठ्या संख्येने भाविक दर्शनासाठी येतात. मंदिरात विशेष म्हणजे स्वयंभू मूर्ती असून त्याचे धार्मिक महत्त्व अधिक आहे. वैशाख अमावास्या शनैश्चर जयंती म्हणून साजरी केली जाते. दरम्यान यावेळी महा प्रसादाचे वाटप देखील केले जाते.

    हेही वाचा- Beed : दिल्लीच्या कार्यक्रमात सादर होणार अस्सल लावणी; बीडची 'ही' तरुणी करणार सादरीकरण, VIDEO

    मंदिरापर्यंत कसे पोहोचाल 

    शनी मंदिर हे बीड शहरातील मोंढा भाग परिसरात आहे. यासाठी तुम्ही मुंबईहून येत असाल, तर 450 किलोमीटर अंतर आहे. पुण्याहून येत असाल 300 किलोमीटरचे अंतर आहे. औरंगाबादमधून येत असाल, तर 150 किलोमीटरचे अंतर आहे. बस आणि खासगी बसेस देखील इथपर्यंत पोहोचतात. स्थानिक नागरिकांशी संपर्क केल्यास ते देखील या मंदिरापर्यंत पोहोचण्यासाठीची माहिती सांगतात.

    Shani Mandir Beed

    गुगल मॅपवरून साभार

    मंदिराची दिनचर्या 

    मंदिर सकाळी 6 वाजायच्या सुमारास दर्शनासाठी खुले केले जाते. दुपारी बारा वाजायच्या सुमारास आरती होते. दर शनिवारी महाआरती आणि प्रसाद देखील असतो. प्रामुख्याने खिचडी हा प्रसाद देवाला दाखवला जातो. संध्याकाळी देखील आरती पार पडते. आरतीनंतर रात्री 8 वाजताच्या सुमारास मंदिर दर्शनासाठी बंद केले जाते.

    First published:
    top videos

      Tags: Beed, Beed news, Famous temples, Maharashtra News, Temple