मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

धनभाऊंचा पुन्हा एकदा पंकजा ताईंना धक्का, होमग्राऊंडवरच दिला धोबीपछाड

धनभाऊंचा पुन्हा एकदा पंकजा ताईंना धक्का, होमग्राऊंडवरच दिला धोबीपछाड

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे. गोपीनाथ गड येथे असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India
  • Published by:  Shreyas

बीड, 7 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते धनंजय मुंडे यांनी पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांना धक्का दिला आहे. गोपीनाथ गड येथे असलेली पांगरी ग्रामपंचायत धनंजय मुंडे यांच्या ताब्यात आली आहे. 11 सदस्यांपैकी 10 सदस्य आणि सरपंचाची बिनविरोध निवड झाली आहे. धनंजय मुंडे यांनी बिनविरोध ग्रामपंचायत काढत पांगरी ग्रामपंचायतीवर राष्ट्रवादी काँग्रेसचा झेंडा लावला आहे.

सुशील वाल्मीक कराड हे सरपंच म्हणून बिनविरोध निवडून आले आहेत. विशेष म्हणजे वैद्यनाथ सहकारी साखर कारखाना आणि स्वर्गीय लोकनेते गोपीनाथ मुंडे यांचं स्मृतीस्थळ गोपीनाथ गड पांगरी ग्रामपंचायत अंतर्गत येतं, त्यामुळे पुन्हा एकदा धनंजय मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना धोबीपछाड दिली आहे.

राज्यातील सीमा कुरतडल्या जात आहेत?, गाव विकासापासून वंचित राहिल्यासारखं का वाटतंय?

ग्रामपंचायत निवडणुकीआधीच गुलाल लागल्यामुळे परळीमधील 80 ग्रामपंचायत निवडणुकीत धनंजय मुंडे वरचढ ठरण्याची शक्यता आहे.

गोपीनाथ मुंडे यांनी याआधी 2019 सालच्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा धक्कादायकरित्या पराभव केला होता. या निवडणुकीत पंकजा मुंडेंसारख्या तगड्या उमेदवाराचा पराभव करत धनंजय मुंडे जाएंट किलर ठरले होते. आता ग्रामपंचायत निवडणुकीतही धनंजय मुंडे यांनी त्यांच्याच बहिणीला आणखी एक धक्का दिला आहे.

CM एकनाथ शिंदेंचा एक फोन अन् बोम्मईंचं लगेच ट्विट! पण, शेवटच्या वाक्यात सीमावादावर मोठं भाष्य

First published:

Tags: Dhananjay munde, Pankaja munde