मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /आता तर कहर झाला! विरोधी सरपंचपदाचा उमेदवार पाडण्यासाठी नवी शक्कल; EVM मशीनचे बटण..

आता तर कहर झाला! विरोधी सरपंचपदाचा उमेदवार पाडण्यासाठी नवी शक्कल; EVM मशीनचे बटण..

मतदान प्रक्रियेदरम्यान, गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

मतदान प्रक्रियेदरम्यान, गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

मतदान प्रक्रियेदरम्यान, गोंधळ उडालेला पाहायला मिळाला.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 18 डिसेंबर : आज राज्यभरात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतदान होत आहे. त्यातच बीडमधून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. ग्रामपंचायत सरपंच पदाच्या उमेदवारांच्या नावासमोर असलेले बटन स्टिकफास्ट टाकून बंद केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आल्याने खळबळ उडाली आहे. ही धक्कादायक घटना बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे उघडकीस आली. याबाबत तक्रार करण्यात आली आहे.

तर तक्रार झाल्यानंतर सदरील मशीन बदलण्यात आली. यामुळे मतदान तब्बल दीड तास बंद झाले होते. तर काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. मतदान रोखण्यासाठी अजब फंडा वापरण्यात आला. त्यामुळे चक्क ईव्हीएम मशीन बदलावी लागली.

बीड तालुक्यातील लिंबागणेश येथे 2 नंबरच्या बुथवर ईव्हीएम मशीनमध्ये गणेश वाणी यांच्या नावासमोर असलेल्या बटनावर स्टिकफास्ट टाकण्यात आल्याचा प्रकार उघडकीस आला. याबाबत उमेदवार वाणी यांनी तक्रार केल्यानंतर मतदान केंद्राध्यक्ष यांनी खात्री केली आणि सदरील ईव्हीएम मशीन बदलण्यात आली.

या प्रकारानंतर काही काळ लिंबागणेश येथे गोंधळ उडाला होता. मतदान प्रक्रियादेखील थांबवण्यात आली होती. सदरील प्रकार कोणी केला याचा तपास करून संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्याची मागणी गणेश वाणी यांनी केली आहे.

हेही वाचा - ..म्हणून सरकारच्या चहापानावर बहिष्कार; विरोधी पक्षनेते अजित पवार अधिवेशनाआधीच आक्रमक

बीडमध्ये आणखी एक धक्कादायक प्रकार -

बीड तालुक्यातील म्हाळस जवळा येथील हा धक्कादायक प्रकार आहे. निवडणूक आयोगाच्या नियमानुसार मतदान केंद्राच्या दोनशे मीटर आवारात मोबाईलच्या वापरावर बंदी असताना देखील सर्रासपणे मोबाईचा वाप सुरू असल्याचं कैद झालं आहे. कळस म्हणजे मतदान केल्याचा व्हिडीओ काढून आणा आणि पैसे घेऊन जा अशी एक अफवा देखील गावात पसरल्यानं गोंधळ निर्माण झाला आहे.

First published:
top videos

    Tags: Beed news, Crime news, Election