बीड, 24 डिसेंबर : साहित्य, नाट्य, कला, क्रीडा यासह सांस्कृतिक कार्यक्रमात अग्रेसर असणार्या संस्कार भारती च्या वतीने देवगिरी प्रांताचा कलासाधक संगम 2022 हा कार्यक्रम बीडमध्ये होत आहे. या कार्यक्रमात लोककेचा जागर केला जात आहे. नाट्य, कला, साहित्य, सांस्कृतिक या कार्यक्रमाची मेजवानी बीडमध्ये मिळत आहे.
संस्कार भारती बीड शाखेच्या वतीने गेल्या 25 वर्षांपासून कंकालेश्वर महोत्सव, दीपोत्सव, नटराज पूजन, भारत माता पूजन या सारखे अनेक सांस्कृतिक व नैमित्तिक कार्यक्रम घेतले जातात. तब्बल दहा वर्षानंतर होणाऱ्या कलासाधक संगमच्या आयोजनाची संधी यावेळी बीडकरांना मिळाली आहे. नाट्य, कला, साहित्य, सांस्कृतिक कार्यक्रमाची मेजवानी या निमित्ताने बीड करांना अनुभवायला मिळत आहे.
नागपूरकरांना मोफत मेजवानी, 5 हजार किलो भाजीचा होणार विश्वविक्रम! Video
14 जिल्ह्यातील कलाकार
बीड येथे 23 ते 25 डिसेंबर दरम्यान संस्कार भरतीच्या देवगिरी प्रांताच्या वतीने साहित्य, नाट्य, कला, क्रीडाचे सादरीकरण करण्यात येत आहे. विशेष म्हणजे 14 जिल्ह्यातील कलाकार या कार्यक्रमात सहभागी झाले आहेत.
शिक्षणासाठी तो करतोय ख्रिसमस साहित्याची विक्री, पाहा Video
लोककलेचा जागर
महाराष्ट्रातील 64 कलांपैकी काही लोककला रंगधारा शोभा सादरीकरण करण्यात येत आहेत. यामध्ये पोतराज,आराधी, वासुदेव अशा लोककलेचे सादरीकरण करण्यात आले. सादरीकरणात लोकपावत चाललेली वाद्य देखील पाहावयास मिळाली. दिमडी, डफ, खनजेरी, मृदंग, ढोलकी आणि हलकी या सर्व वाद्यांवर ठेका धरत यात्रेची शोभा वाढवली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.