Home /News /maharashtra /

Sambhajiraje Chatrapati : रयतेचा राजा बळीराजाच्या मदतीला आला धावून, संभाजीराजेंनी शेतकऱ्यासोबत केली पेरणी

Sambhajiraje Chatrapati : रयतेचा राजा बळीराजाच्या मदतीला आला धावून, संभाजीराजेंनी शेतकऱ्यासोबत केली पेरणी

छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje chtrapati) गेल्या दोन दिवसापासून मराठवाडा दौऱ्यावर (sambhajiraje marathwada tour) असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातील (beed) विविध भागात दौरा केला

  बीड, 28 जून : एकीकडे राज्यात राजकीय भूकंप (politics in Maharashtra) सुरू असताना दुसरीकडे मात्र छत्रपती संभाजीराजे (sambhajiraje chtrapati) गेल्या दोन दिवसापासून मराठवाडा दौऱ्यावर (sambhajiraje marathwada tour) असून त्यांनी आज बीड जिल्ह्यातील (beed) विविध भागात दौरा केला जिल्ह्यातील नारायणगड आणि गेवराई शहरातील कार्यक्रमांना हजेरी लावल्यानंतर,त्यांनी तलवाडा येथे शेतकऱ्यांशी (farmers meets sambhajiraje chatrapati) संवाद साधला. यावेळी तलवाडा शिवारात, थेट बैलाचा कासरा हातात घेत, संभाजीराजेंनी पेरणी केली आहे.या दरम्यान "इडा पिडा जाऊदे आणि बळीच राज्य येऊ दे".असं म्हणत कार्यकर्त्यांनी जयघोष केला.

  तर यावेळी छत्रपती संभाजीराजेंनी शेतकऱ्याच्या घरी बाजावर बसून जेवण केलं. यादरम्यान त्यांनी हातावर ठेचा भाकर घेऊन अतिशय साधेपणाने जेवण केल्याने, शेतकऱ्यांच्या नजरा छत्रपती संभाजीराजेंकडे कुतूहलतेने पहात होत्या. तर यावेळी शेतकऱ्याचा मुलगा शेजारी जेवत असताना, राजेंनी यावेळी त्याला मायेचा घास देखील भरवला. यामुळे छत्रपती संभाजी राजांच्या साधेपणाची चर्चा मात्र आता तलवाडा आणि जिल्हाभरात होऊ लागली आहे.

  हे ही वाचा : ...म्हणून गुवाहाटीला निघून आलो, उदय सामंत अखेर बोलले

  राज्यातील घडामोडींवर संभाजीराजे छत्रपती म्हणाले

  मला राज्यसभेची उमेदवारी दिली असती, तर शिवसेनेवर आज ही वेळ आली नसती, असे खोचक वक्तव्य दोनच दिवसांपूर्वी करणाऱ्या संभाजीराजे छत्रपती यांनी शुक्रवारी राज्यातील राजकीय घडामोडींवर भाष्य करणे टाळले. शिवसेनेत काय घडतेय हा त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे. त्यामुळे त्यावर आपणास काही बोलायचे नाही, असे ते म्हणाले. राज्यातील शेतकरी, कष्टकरी आणि सामान्यांना अनेक समस्या भेडसावत असून, त्या सोडविण्यासाठी कुठले का असेना, सरकार लवकर यावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

  'मला जे बोलायचे होते, ते मी दोन दिवसांपूर्वी बोललो. त्यामुळे या विषयावर मला आता काही बोलायचे नाही. शिवसेनेतील बंड हा त्या पक्षाचा अंतर्गत विषय आहे. राज्यात कष्टकरी, शेतकरी, सामान्य नागरिकांचे अनेक प्रश्न प्रलंबित आहेत. पाऊसही लांबणीवर पडला आहे. अशा परिस्थितीत कुणाचे का असेना, राज्यात लवकरात लवकर सरकार यावे आणि त्यांनी काम सुरू करावे, अशी अपेक्षा संभाजीराजे यांनी व्यक्त केली.

  हे ही वाचा : उद्धव ठाकरेंनी खरंच फडणवीसांना फोन केला का? 'मातोश्री'वरून आला खुलासा

  राज्यातील सामान्यांचे प्रश्न मोठे असून, त्यासाठी आपण राज्यभर दौरा करीत आहोत. सरकारने सामान्य जनतेचे प्रश्न सोडविण्यास प्राधान्य द्यायला हवे, असे संभाजीराजे यावेळी म्हणाले.

  Published by:Sandeep Shirguppe
  First published:

  Tags: Beed, Beed news, Sambhajiraje chhatrapati

  पुढील बातम्या