Home /News /maharashtra /

बीडचे मठाधिपती खाडे महाराज वादाच्या भोवऱ्यात, महिलेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल

बीडचे मठाधिपती खाडे महाराज वादाच्या भोवऱ्यात, महिलेच्या तक्रारीवरुन बलात्काराचा गुन्हा दाखल

बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र हनुमानगडचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराजांवर बलात्काराचा गुन्हा दाखल झाला आहे.

बीड, 6 जुलै : बीडच्या पाटोदा तालुक्यातील सावरगाव येथील श्री क्षेत्र हनुमानगडचे मठाधिपती बुवासाहेब खाडे महाराज हे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहेत. त्यांच्याविरुद्ध अहमदनगर जिल्ह्यातील खर्डा पोलीस ठाण्यात एका 29 वर्षीय महिलेने बलात्कार केल्याची तक्रार दिलीय. विशेष म्हणजे महिलेच्या तक्रारीआधी मठाधिपतींनी सुद्धा मारहाण करून धमकावल्याप्रकरणी 5 जणांवर गुन्हा नोंदविला होता. यामुळे बीड जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे. हनुमानगडाचे मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे (वय 56) यांनी खर्डा पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीत आपली बाजू मांडली आहे. या तक्रारीनुसार, खाडे महाराज 29 जुलैला जामखेड तालुक्यातील मोहरी येथे महादेवाच्या मंदिराचे काम पाहण्यासाठी गेले होते. यावेळी बाजीराव गित्ते, अरुण गिते, भिवा गोपाळघरे, राहुल गिते आणि रामा गिते यांनी मठाधिपती खाडे यांना घुगे वस्तीवरील बाजीराव गिते यांच्या घरात बोलावून मारहाण केली, असं खाडे महाराजांनी आपल्या तक्रारीत म्हटलं आहे. (एकनाथ शिंदेंकडून 'उद्धव ठाकरे गट' असा उल्लेख, मुख्यमंत्र्यांनी ट्वीटमध्ये नेमकं काय म्हटलं?)
"पहाटे दीडच्या दरम्यान राहुल गिते याने मोबाईलमधील फोटो दाखवून दमदाटी केली. त्यानंतर आपल्ला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. यावेळी त्याने दोरी दाखवून फाशी देण्याची धमकी दिली आणि पहाटे साडेपाच वाजता तो कोयता घेऊन अंगावर धावला. या दरम्यान जीवे मारण्याची धमकी देत माझ्या गळ्यातील सोन्याची चैन, अंगठ्या, मनी असा 13 लाख 60 हजार रुपयांचा ऐवज काढून घेतला", अशा स्वरूपाच्या फिर्यादीवरून, खर्डा पोलीस ठाण्यात 5 जणांवर 3 ऑगस्ट रोजी गुन्हा नोंद झाला आहे.
संबंधित प्रकार घडल्यानंतर 4 ऑगस्ट रोजी मोहरी येथील एका 29 वर्षीय महिलेने, रात्री 9:15 च्या सुमारास खर्डा पोलीस ठाण्यात तक्रार दिलीय. या तक्रारीनुसार, मठाधिपती बुवासाहेब जिजाबा खाडे यांनी जून ते 12 जुलै 2022 दरम्यान सोन्याचे दागिने आणि लग्न करण्याचे आमिष दाखवून वेळोवेळी बळजबरीने लैंगिक अत्याचार केला, असा आरोप करण्यात आला. यावरून मठाधिपती बुवासाहेब खाडे यांच्यावर खर्डा पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आलाय. दरम्यान या घटनेने पाटोदा तालुक्यासह जिल्ह्यात एकचं खळबळ उडाली आहे.
Published by:Chetan Patil
First published:

Tags: Crime, Rape

पुढील बातम्या