मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /'रामदास कदम यांनी कंपन्यांकडून खोके घेतले..' चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

'रामदास कदम यांनी कंपन्यांकडून खोके घेतले..' चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

चंद्रकांत खैरेंचा गंभीर आरोप

रामदास कदम यांनी कंपनी वाल्याकडून खोके गोळा केले, असा गंभीर आरोप ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 20 मार्च : काल (रविवारी 19 मार्च) रामदास कदम यांचा गृह तालुका खेडमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची जाहीर सभा पार पडली. या सभेतून रामदास कदम, मुख्यमंत्री शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला. यानंतर ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांनी रामदास कदम यांच्यावर गंभीर आरोप केले आहेत. ठाकरे गटाचे नेते चंद्रकांत खैरे यांच्या उपस्थितीत बीडमध्ये महाविकास आघाडी सरकारमधील पदाधिकाऱ्यांची बैठक घेण्यात आली. त्यावेळी ते बोलत होते.

रामदास कदम यांच्याावर खैरेंचे गंभीर आरोप

काँग्रेस, राष्ट्रवादी आणि ठाकरे गट शिवसेना यांच्या कार्यकर्त्यांना खैरेंनी मार्गदर्शन केले. येत्या दोन एप्रिल रोजी संभाजीनगर येथे महाविकास आघाडी सरकारमधील नेत्यांची सभा होणार आहे. याच पार्श्वभूमीवर ही बैठक बोलावली असल्याचं खैर यांनी सांगितले. सध्या शिंदे आणि फडणवीस सरकारमधील नेत्यांमध्ये जागा वाटपावरून वाद सुरू आहे. परंतु, हा वाद केवळ जागा वाटपावर नाही तर सगळ्याच दृष्टिकोनातून असून त्यांचे कधीही दोन तुकडे होईल अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचं खैरे यांनी म्हटले. तर रामदास कदम यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केलेल्या टीकेला खैरे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. रामदास कदम यांनी शिवसेनेत असताना प्रचंड भ्रष्टाचार केला. त्यांनी कुठून आणले इतके पैसे? असा सवाल उपस्थित केला. दरम्यान शेतकऱ्यांच्या प्रश्नावर देखील खरेदी सरकारवर टीका केली.

वाचा - pension strike : पेन्शनचं मिशन संपलं, सरकारी कर्मचाऱ्यांचा संप अखेर मागे

शिवसेनेचे नेते रामदास कदम यांच्यावर चंद्रकांत खैरे यांनी घणाघाती टीका केली. कंपन्यांना पर्यावरणाविषयी नोटीसा देऊन धमकवायचं आणि त्यांच्याकडून खोके गोळा करायचे. संभाजीनगरला सुद्धा खूप पैसे गोळा केले. खूप मोठा भ्रष्टाचार केला. एवढे पैसे रामदास कदमकडे कुठून आले. गाडी, बंगला, हॉटेल हे सगळं खोक्यामधून आलं असा आरोपही चंद्रकांत खैरे यांनी केला आहे.

First published:
top videos

    Tags: Beed, Ramdas kadam