मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राज ठाकरेंना मोठा दिलासा, अजामीनपत्र अटक वॉरंट रद्द, 500 रुपयांचा ठोठावला दंड

राज ठाकरेंना मोठा दिलासा, अजामीनपत्र अटक वॉरंट रद्द, 500 रुपयांचा ठोठावला दंड

 कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid Rural, India
  • Published by:  sachin Salve

बीड, 18 जानेवारी : चिथावणीखोर वक्तव्य आणि बसवर दगडफेक प्रकरणी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना मोठा दिलासा मिळाला आहे. परळी कोर्टाने राज ठाकरेंविरोधातला अजामीनपात्र वॉरंट रद्द केला आहे. राज यांना दिलासा मिळाल्यामुळे कार्यकर्त्यांनी कोर्टाच्या परिसरात एकच जल्लोष केला.

चिथावणीखोर वक्तव्य आणि‎ मनसेच्या कार्यकर्त्यांनी बसवर‎ केलेल्या दगडफेक प्रकरणी तारखेला सतत गैरहजर राहिल्याने परळी‎ न्यायालयाने राज ठाकरेंना‎ अजामीनपात्र वॉरंट बजावले होते. त्या प्रकरणात जामीन घेण्यासाठी राज ठाकरे हे परळी कोर्टात हजर झाले होते.

(शिवसेनेच्या 'सामना'च्या पहिल्या पानावर झळकला पंतप्रधान मोदींचा फोटो, शिंदे-फडणवीसही दिसले!)

कोर्टाने राज ठाकरे गैरहजर का असल्याबद्दल विचारणा केली. राज ठाकरे हे मध्यंतरी रुग्णालयामध्ये होते, याची माहिती राज यांच्या वकिलांनी दिली. त्यानंतर कोर्टाने 500 रुपयांचा दंड ठोठावत वॉरंट रद्द केलं आहे.

(शिंदे गटाचा आता मनसेला धक्का! नागपूरमधील महिला नेत्याचा कार्यकर्त्यांसह पक्षप्रवेश)

2008 मध्ये राज‎ ठाकरे यांना एका प्रकरणात मुंबईत‎ अटक करण्यात आल्यांनतर या‎ अटकेचे पडसाद परळीतही उमटले‎ होते. परळीतील धर्मापुरी पॉईंटवर‎ मनसे कार्यकर्त्यांनी बसवर‎ दगडफेक केल्यानंतर मनसेच्या‎ कार्यकत्यांवर आणि राज ठाकरे‎ यांच्यावर गुन्हा दाखल झाला होता.‎ पोलिसांनी दोषारोप पत्र दाखल‎ केल्यानंतर राज ठाकरे परळीच्या‎ न्यायालयात तारखेला गैरहजर‎ राहिल्यामुळे त्यांच्याविरुद्ध‎ अजामीनपात्र वॉरंट जारी केले होते.‎ या पूर्वी ३ आणि १२ जानेवारीला राज ठाकरेंना परळी‎ न्यायालयात हजर राहण्यास‎ सांगितले होते. परंतु, काही कारणामुळे ते येवू शकले नव्हते. मात्र, आज राज ठाकरे हे कोर्टात हजर झाले आणि अवघ्या काही मिनिटामध्ये कोर्टाने वॉरंट रद्द केला आहे. पुढील सुनावणी ही 23 जानेवारीला होणार आहे.

First published: