मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

ताईसाठी प्रितम मुंडेंची बॅटिंग, शिंदे-फडणवीसांकडे पंकजांसाठी मागितलं हे मंत्रीपद

ताईसाठी प्रितम मुंडेंची बॅटिंग, शिंदे-फडणवीसांकडे पंकजांसाठी मागितलं हे मंत्रीपद

पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देण्यात यावं, अशी मागणी त्यांच्या बहीण खासदार प्रितम मुंडे यांनी जाहीर सभेमध्ये केली आहे. शिंदे फडणवीस सरकार आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का? याकडे मात्र संबंध राज्याचे लक्ष लागलं आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Shreyas

अंबाजोगाई, 27 सप्टेंबर : बीड जिल्ह्याचा विकास करण्यासाठी पंकजा मुंडेंना पालकमंत्री करा, अशी मागणी भाजपा खासदार प्रितम मुंडे यांनी जाहीर भाषणात केली. अंबाजोगाई येथे आयोजित कार्यक्रमात त्या बोलतं होत्या. शिंदे फडणवीस सरकार आता पंकजा मुंडे यांना मंत्रिपद देणार का? याकडे मात्र संबंध राज्याचे लक्ष लागलं आहे.

भाजप नेत्या पंकजा मुंडे यांना आमदारकी आणि मंत्रीपदाची संधी हुकल्याने कार्यकर्त्यांनी उघड उघड नाराजी व्यक्त केली होती, मात्र आता चक्क पंकजा मुंडे यांच्या बहीण खासदार प्रीतम मुंडे यांनी नाराजी व्यक्त केली. तसेच शिंदे फडणवीस सरकार मध्ये पंकजा मुंडे यांना मंत्रिपद मिळावं, असं जाहीर कार्यक्रमात बोलून दाखवलं. पंकजाताईनेच पुन्हा जिल्ह्याच्या पालकमंत्री म्हणून काम पाहावं, अशी इच्छाही प्रितम मुंडे यांनी व्यक्त केली आहे.

Video: मोदींनी ठरवलं तरी मला संपवू शकत नाही, पंकजा मुंडे यांच्या वक्तव्याने खळबळ

पंकजा ताई मागची पाच वर्ष पालकमंत्री असतांना त्यांनी जिल्ह्यात राष्ट्रीय महामार्ग आणले, रेल्वे आणली, मोठे उद्योग सुरू करण्यासाठी हे महत्वाचे असते. आता परत बीडच्या पालकमंत्री पंकजा ताई झाल्या, तर राहिलेला विकास सुद्धा पूर्ण होईल, म्हणून प्रीतम मुंडे यांनी पंकजा मुंडे यांना बीडच्या पालक मंत्री करण्याची मागणी केली आहे.

First published:

Tags: Pankaja munde