बीड, 20 डिसेंबर : राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार संदीप क्षीरसागर आणि माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर या काका-पुतण्यातील सत्ता संघर्ष ग्रामपंचायत निवडणुकीत देखील पहावयास मिळाला आहे. नवगन राजुरी जिल्हा परिषद सर्कल मधील नवगण राजुरी या होमपीचवर माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्या गटाचा धुव्वा उडवत संदीप क्षीरसागर यांनी काकाला धोबीपछाड दिला.
या सर्कलमधील चार ग्रामपंचायत संदीप क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत. धन जनशक्ती विरुद्ध जनशक्तीमध्ये जनशक्तीचा विजय झाला. तसेच मुंबईत राहून ग्रामपंचायत निवडणुका जिंकता येत नाहीत त्याला जनतेत उतरावा लागते म्हणत संदीप क्षीरसागर यांनी लगावला काकांना टोला.
राजुरी मतदारसंघातील पहिल्या फेरीत सर्वच ग्रामपंचायत राष्ट्रवादीचा ताब्यात आले आहेत. तालुक्यासह जिल्ह्यातील सर्वात जास्त ग्रामपंचायत राष्ट्रवादी जिंकणार, असा विश्वास आमदार संदीप क्षीरसागर यांनी व्यक्त केला.
गेल्या पाच, सात वर्षांपासून संदिप क्षीरसागर आणि माजीमंत्री जयदत्त क्षीरसागर यांच्यातील सत्ता संघर्ष सगळ्या महाराष्ट्राने पाहिला आणि अभुवला आहे. पाच वर्षापूर्वी झालेल्या ग्रामपंचायत निवडणुकीत आमदार क्षीरसागरांनी नवगण राजुरीच्या ग्रामपंचायतीवर आपला झेंडा फडकवला होता. त्याचीच पुनरावृत्ती पुन्हा एकदा यावेळी त्यांनी केली.
जयदत्त क्षीरसागर यांचे होमग्राउंड असणाऱ्या राजुरीमध्ये आमदार क्षीरसागर यांच्या पॅनलचा मोठा विजय झाला आहे. त्याचसोबत उमरद जहागीर, लिंबारुई, दगडी शहजाणपूर या ग्रामपंचायत देखील आमदार क्षीरसागर यांच्या ताब्यात आल्या आहेत.
हेही वाचा - मोठी बातमी! गुजरात भाजपचे बॉस यांच्या कन्येच्या पॅनेलचा दारुण पराभव, पाहा, जळगाव जिल्ह्यातील निकाल
राज्यात 34 जिल्ह्यात ग्रामपंचायत निवडणुकांच्या मतमोजणीची रणधुमाळी पाहायला मिळणार आहे. 34 जिल्ह्यातील 7 हजार 135 ग्रामपंचायतींच्या सदस्यपदांसह थेट सरपंचपदासाठी रविवारी मतदान पार पडलं. यात सरासरी 74 टक्के मतदान झालं. आज या निवडणुकीचा निकाल आता समोर येत आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.