बीड, 16 जानेवारी : प्रत्येकालाच आजकाल आपण काय खातोय याची काळजी घेण्याची गरज आहे. बाजारातील अनेक पदार्थांमुळे आपला जीव धोक्यात येऊ शकतो. आपण रोज कितीतरी प्रमाणात अशा घटकांचं सेवन करतो जे घटक आपल्या शरीरासाठी अत्यंत अपायकारक आहेत. सध्या बाजातर ठिकठिकाणी वाटाण्याच्या शेंगांची विक्री होत आहे. मात्र, यात देखील घातक असे कलरचे मिश्रण केले जात असल्याचे समोर आलं आहे.
वेगवेगळ्या सीझनमध्ये बाजारपेठेत फळे, खाद्यपदार्थ विक्रीसाठी दाखल होतात. मात्र, फळ भाज्यांसह इतरही खाद्यपदार्थामध्ये भेसळ होत आहे. ग्राहक आकर्षक व्हावा, यासाठी कृत्रिम रंग देखील दिले जात आहेत. मात्र, सध्या बाजारात वाटाण्याच्या शेंगा मोठ्या प्रमाणात विक्रीसाठी दाखल आहेत. शेंगा सोलून खुल्या वाटाण्यांची देखील विक्री होत आहे. खुल्या वाटाण्यांना रंग लागून विक्रीचा प्रकार अनेक ठिकाणी घडत असल्याचे पाहायला मिळत आहे.
कॅन्सरचाही धोका
हाॅटेलमध्ये, घरी खाण्यासाठी देखील मोठ्या प्रमाणात खुल्या वाटाण्याची खरेदी होत आहे. वाटाण्यात मिसळलेला फ्रिझर्वेटिव्ह कलर शरीरास घातक असतो. कलरचे अधिक प्रमाण वापरणे देखील बेकायदेशीर आहे. मात्र, रस्त्यावरील विक्रेते कोणतेही प्रमाण लक्षात न घेता कलरचा वापर करतात. असा कलर अधिक प्रमाणात शरीरात गेला तर गंभीर परिणाम भोगावे लागू शकतात. तज्ञाच्या मते तर कॅन्सर देखील होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
लाखो भाविकांच्या उपस्थितीत अक्षता सोहळा संपन्न, पाहा Video
फ्रिझर्वेटिव्ह कलरच्या शेंगा ग्राहकांनी खरेदी करू नये. जर असा प्रकार कुठे आढळला तर जिल्हा अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करावा. प्रशासन देखील अशा विक्रेत्यांवर लक्ष ठेवून असल्याचे अन्न औषध प्रशासनाचे इम्रान हाश्मी यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.