बीड, 20 मार्च : भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा माजी मंत्री धनंजय मुंडे यांच्यावर जोरदार निशाणा साधला आहे. 2024 च्या निवडणुकीत मुलीला राजकारणात मान खाली घालायला लावू नका. 2019 च्या निवडणुकीत तुम्ही मला जिंकून दिलं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र काही वेगळचं असतं. पुरुषाने कसे वागले तरी त्याला माफ कराल का? मी आणलेल्या कामाचे नारळ फोडून त्यांनी विजय मिळवला, असं म्हणत पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडे यांच्यावर अप्रत्यक्ष निशाणा साधला आहे.
पंकजा मुंडेंची कार्यकर्त्यांना भावनिक साद
बीडच्या परळी मतदारसंघातील जलजीवन मिशन कामाचे भूमिपूजन पंकजा मुंडे यांच्या हस्ते झाले, त्यावेळी त्या बोलत होत्या. पंकजा मुंडे यांनी 2024 च्या विधानसभा निवडणुकीच्या मोर्चेबांधणीला सुरुवात केल्याचं पहायला मिळत आहे. निवडणुकीत मुलीला राजकारणात मान खाली घालायला लावू नका असं म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांना भावनिक साद घातली आहे. तसेच 2019 च्या निवडणुकीत मला जिंकून दिलं असतं तर महाराष्ट्राच्या राजकारणात चित्र काही वेगळंच असतं असंही त्यांनी म्हटलं आहे.
मोठी बातमी! संजय राऊतांवर गुन्हा दाखल, 'ते' प्रकरण भोवलं; अडचणी वाढणार?
धनंजय मुंडेंना टोला
दरम्यान यावेळी बोलताना पंकजा मुंडे यांनी धनंजय मुंडेंना देखील अप्रत्यक्ष टोला लगावला आहे. स्त्री, पुरुष भेद बाजूला ठेऊन आता विकास करणार आहे. पुरुषाने कसेही वागले तरी त्याला माफ करणार का? मी आणलेल्या कामाचे नारळ फोडून त्यांनी विजय मिळवला. मला काम करता येते बोलता येत नाही. न बोलणाऱ्याचे गहू विकत नाहीत असं म्हणत त्यांनी राष्ट्रवादीचे नेते माजी मंत्री धनंजय मुंडे यांना अप्रत्यक्ष टोला लगावला आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Beed, BJP, Dhananjay munde, Election, NCP, Pankaja munde