मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'आमचे नेते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा' पंकजा मुंडेंचा निशाणा नेमका कुणावर?

'आमचे नेते पंतप्रधान मोदी आणि अमित शहा' पंकजा मुंडेंचा निशाणा नेमका कुणावर?

'प्रदेशाध्यक्षांना मी त्रास द्यायचा ठरवलं तर रोज दोन चार हजार लोक भेटतील. मात्र मी कधीही कुणाला त्रास देत नाही'

'प्रदेशाध्यक्षांना मी त्रास द्यायचा ठरवलं तर रोज दोन चार हजार लोक भेटतील. मात्र मी कधीही कुणाला त्रास देत नाही'

'प्रदेशाध्यक्षांना मी त्रास द्यायचा ठरवलं तर रोज दोन चार हजार लोक भेटतील. मात्र मी कधीही कुणाला त्रास देत नाही'

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India
  • Published by:  sachin Salve

बीड, 21 जानेवारी : 'गोपीनाथ मुंडे साहेबांचे नेते अटलजी, अडवाणी होते. आज आमचे नेते मोदी आणि शहा आहेत' असं विधान केल्यामुळे भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे यांचा निशाणा कुणावर अशी राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली.

आंबेजोगाई इथं आयोजित मराठवाडा शिक्षक मतदारसंघातील उमेदवार किरण पाटील यांच्या प्रचार सभा आयोजित करण्यात आली होती. यावेळी पंकजांनी जोरदार भाषण केलं. यावेळी व्यासपीठावर चंद्रशेखर बावनकुळे आणि बीड जिल्ह्यातील सर्व आमदार उपस्थित होते

'प्रदेशाध्यक्षांना मी त्रास द्यायचा ठरवलं तर रोज दोन चार हजार लोक भेटतील. मात्र मी कधीही कुणाला त्रास देत नाही. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांनी पंकजाताईला विमानात घेऊन आले. याचा त्यांना पुढील दोन महिने त्रास होईल असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा चिमटा काढला आहे.

('आता सगळ्यांनी गोड गोड बोलायचं', एकनाथ शिंदेंची शरद पवारांच्यासमोर जोरदार बॅटिंग)

पुढे बोलताना पंकजा मुंडे म्हणल्या की, 'मी काही कधी कुणाला त्रास देत नाही मी जर ठरवलं त्रास द्यायचं तर रोज दोन चार हजार लोक भेटतील तुम्हाला हे बांधून ठेवलंय मी त्यांना नजरेने बांधले आहेत काय मागायचं नाही काय म्हणायचं नाही असं सांगितलं आहे. तसंच मुंडे साहेबांचे नेते अटलजी आणि अडवाणी होते तसंच माझे नेते मोदी आणि शहा आहेत असं म्हणत पंकजा मुंडे यांनी पुन्हा एकदा राज्यातील पक्ष श्रेष्ठींना नेते मानायला तयार नसल्याचे दाखवून दिले आहे.

(बीडमध्ये पंकजा मुंडे नाराज अन् मुंबईत फडणवीस धनंजय मुंडेंच्या भेटीला, चर्चांना उधाण)

बीडच्या सभेत मला कळलं नाही ही सुटका आहे का, रोज मला असे मेसेज की मी जीव द्यावा. मी डिफरेंस व्हायचं मेसेज यायचे. साहेबांचे नेते अटलजी आडवाणी होते आज आमचे नेते मोदी आणि शहा आहेत. मोदी हे तर रेकॉर्डच करायला लागले. जगात सगळ्यात जास्त सदस्य असलेला पक्ष भाजप. त्याचे नेते मोदी, जगात सगळ्यात जास्त लोकप्रिय नेता नरेंद्र मोदी आहे. जगात सगळ्यात जास्त मताने निवडून येणारे नेते अमित शहा आहे. आम्ही हे सगळं बघतोय यात आम्ही कुठे दिसतोय का हे पाहतो. राजकारणात सगळ्यांना नमस्कार घालावाच लागतो. प्रदेशाध्यक्ष बावनकुळे यांना त्रास द्यायला जाऊ नका, असा आदेशही पंकजांनी आपल्या कार्यकर्त्यांना दिला.

First published:

Tags: Pankaja munde, पंकजा मुंडे