मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /UGC च्या सूचनांकडे 85 टक्के महाविद्यालयाचे दुर्लक्ष, सामाजिक कामाबद्दल अनास्था उघड

UGC च्या सूचनांकडे 85 टक्के महाविद्यालयाचे दुर्लक्ष, सामाजिक कामाबद्दल अनास्था उघड

कॅच दी रेन

कॅच दी रेन

विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न कॉलेज, शैक्षणिक संस्था यांना ‘कॅच दी रेन’ उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, बीड जिल्ह्यातील 15 टक्केच महाविद्यालयांकडून हा उपक्रम राबवण्यात आला आहे.

पुढे वाचा ...

  बीड, 20 ऑगस्ट :  दुष्काळी परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी विद्यापीठ अनुदान आयोगाने (यूजीसी) देशातील विद्यापीठे, त्यांच्याशी संलग्न कॉलेज, शैक्षणिक संस्था यांना ‘कॅच दी रेन’ (Catch the Rain) उपक्रम राबवण्याच्या सूचना दिल्या होत्या. परंतु, बीड जिल्ह्यातील 15 टक्केच महाविद्यालयांकडून हा उपक्रम राबवण्यात आल्याची माहिती समोर आली आहे. या आकडेवारीतून यूजीसीने दिलेल्या आदेशाला अनेक महाविद्यालयांनी केराची टोपली दाखवल्याचे स्पष्ट होत आहे.

  बीड जिल्ह्याची दुष्काळी जिल्हा म्हणून ओळख आहे. दुष्काळाच्या झळा बीड करांना नेहमीच सोसाव्या लागतात. भूजल पातळी वाढावी याकरिता शासन स्तरावरून अनेक योजना आखल्या जातात. मात्र, प्रत्यक्षात या योजना काही ठिकाणी राबवल्या जात नाहीत. छतावर पडणारे पावसाचे पाणी साठवण्यासाठी यूजीसीने महाविद्यालयांना ‘कॅच द रेन उपक्रम’ राबवण्याच्या सूचना दिल्या. महाविद्यालयात इमारतीवर रूट ऑफ रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारणे आवश्यक होते. पावसाचे पाणी भूगर्भात जावे आणि पाण्याची पातळी वाढावी यासाठी हा प्रकल्प उभा करण्याचे धोरण आहे. मात्र, जिल्ह्यातील 85 टक्के महाविद्यालयांनी ही योजना राबवली नाही.

  हेही वाचा- नर मादी धबधबे बहरले; नयनरम्य दृश्य पाहण्यासाठी पर्यटकांची गर्दी

  यूजीसी कारवाई करणार का?

  शासनाच्या विविध विभागामार्फत कॅच दी रेन प्रकल्पाची जनजागृती देखील केली जात आहे. काही महाविद्यालयांनी त्यांच्या इमारतीवर ही व्यवस्था केली असली तरी ही संख्या अगदी कमी प्रमाणात आहे. महाविद्यालयात पाणी आडवा, पाणी जिरवा असे पाणी वाचवण्याचे धडे विद्यार्थ्यांना दिले जातात. मात्र, महाविद्यालयांकडूनच ही योजना राबवण्यासाठी पाठ दाखवली जाते. जिल्ह्यात हा प्रकल्प  फक्त 15 टक्केच महाविद्यालयाकडून राबवण्यात आला आहे. यूजीसीने दिलेल्या आदेशाला अनेक महाविद्यालय  केराची टोपली दाखवली आहे. त्यामुळे योजना न राबवणाऱ्या महाविद्यालयावर यूजीसी कारवाई करणार का, असा प्रश्न आता निर्माण झाला आहे.

  हेही वाचा- ऐतिहासिक वारसा आणि दारूगोळ्याचे भंडार असलेला परांडा किल्ला

  रेन वॉटर हार्वेस्टिंग ही घरांसाठी स्वयं पुरवठ्याची सर्वात सोपी आणि सर्वात जुनी पद्धत आहे, जी दक्षिण आशिया आणि इतर देशांमध्ये हजारो वर्षांपासून वापरली जात आहे. शाळा, रुग्णालये आणि इतर सार्वजनिक रेन वॉटर हार्वेस्टिंग बसवले जाऊ शकते जेणेकरून जमिनीतील जल पातळी वाढण्यास मदत होईल.

  काय आहे कॅच द रेन उपक्रम  

  महाविद्यालयाच्या उंच इमारतीवर पावसाचे पाणी पडते याच पडलेल्या पावसाच्या पाण्याला पाईपलाईनद्वारे बोर किंवा जमिनीमध्ये सोडले जाते व त्यातूनच भूगर्भातील जलपातळीमध्ये वाढ होते. याच अनुषंगाने विश्वविद्यालयाच्या सचिवांनी एक परिपत्रक काढून सर्व विद्यापीठ आणि सलग्न महाविद्यालयांना रूफ टॉप रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प उभारण्याचे निर्देश दिले होते. बलभीम  महाविद्यालयात साधारणतः चार वर्षांपूर्वी हा प्रकल्प राबवण्यात आला असून यासाठी 30 ते 35 हजार रुपये खर्च आला होता. या प्रकल्पाकडे दरवर्षी प्रामुख्याने लक्ष देऊन मेंटेनन्स देखील केले जात असल्याची  माहिती महाविद्यालयाचे सानपप्राचार्य डॉ वसंत यांनी दिली.

  First published:

  Tags: Beed, Beed news, बीड