बीड, 26 डिसेंबर : बीड जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातील सौताडा गावाच्या शिंदे वस्तीवरील ग्रामस्थांना दळणवळणासाठी रस्ता नाही. येथील विद्यार्थ्यांना पाण्यातून चक्क थर्माकोलवर वसून प्रवास करावा लागतो. विद्यार्थ्यांची ही जीवघेणी कसरत गेल्या 15 वर्षांपासूनची आहे. प्रशासन गावासाठी रस्ता करण्याबाबत उदासीन असल्याचे ग्रामस्थांचे म्हणणे आहे.
मागील काही दिवसांपूर्वी विद्यार्थी थर्माकोलवरून वरून प्रवास करत असताना, पाण्यात पडले. सुदैवाने सोबत वस्तीवरून नागरिक होते. त्यावेळी मोठी दुर्घटना टळली. मात्र, हा पाण्यातून प्रवास हा नेहमीचा बनला आहे. त्यामुळे मुलांचे काही बरेवाईट झाले तर याला जबाबदार कोण, असा सवाल स्थानिक नागरिक करीत आहेत.
Video : बैलगाड्यांच्या खरेदीकडं शेतकऱ्यांची पाठ, पाहा काय आहेत कारणं?
आमचा पाण्यात तोल गेला…
सौताडा येथून काही अंतरावर आमचं गाव शिंदेवस्ती आहे. वस्तीवरून शाळेत जाण्यासाठी रस्ताच नाही. यामुळे पाण्यातून प्रवास करावा लागतो. थर्माकोलवरून प्रवास करताना आमचा पाण्यात तोल गेल्याची घटना घडली होती. मात्र, पालकांमुळे आमचा जीव वाचला आहे. पंधरा वर्षांपेक्षा अधिक कालावधीपासून या ठिकाणी रस्ता नाही.
मुंबईजवळच्या गावात आजही शाळा आणि हॉस्पिटल नाही, रोज करावा लागतो बोटीनं प्रवास
पूल बांधून द्यावा
सौताडा ते शिंदेवस्ती यादरम्यान चार किलोमीटरचा अंतर असून तलाव ओलांडून वस्तीवर जावे लागते. जिल्हा परिषद शाळेला जर यायचे झाले तर मुलांना थर्माकोलवर वसून शाळेत जावे लागते. मागील 15 वर्षापासून असाच आमचा जीवघेणा प्रवास चालू आहे. शासनाकडून अद्याप आम्हाला रस्ता देण्यात आलेला नाही. शासनाने इथं पूल बांधणी करून द्यावी, अशी मागणी स्थानिक रहिवासी बाबू शिंदे यांनी केली आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.