बीड, 9 जानेवारी : बीडमधील भाजी मंडी परिसातील असणाऱ्या शाळेच्या परिसरात मोठी वाहतूक कोंडी होत आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला विद्यार्थ्यांना रस्त्याने चालणे देखील अवघड बनले आहे. अरुंद रस्ता, दुकानदारांचे अतिक्रमण यामुळे वाहतुकीस समस्या निर्माण झाली आहे. विद्यार्थ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे.
वाढत्या लोकसंख्येमुळे शहरात वाहतूक समस्या दिवसेंदिवस वाढत आहे. वाढत्या वाहनांच्या वापरामुळे वाहतूक कोंडीचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. हात गाड्यांच्या अतिक्रमणामुळे देखील ट्रॅफिकची समस्या वाढली आहे. शाळा भरण्याच्या व सुटण्याच्या वेळेला रस्त्यावर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. येथील चौकात असणारे सिग्नल केल्या काही दिवसांपासून शोभेची वस्तू बनले आहे. वाहतूक शाखेने देखील याबाबत प्रशासनाशी पत्र व्यवहार केला मात्र अद्याप दुरूस्ती काम झालेलं नाही. परिणामी दररोज विद्यार्थी आणि येथील बाजारात येणाऱ्या नागरिकांना वाहतूक कोंडीचा सामना करावा लागत आहे.
बीड शहरातील भाजी मंडी परिसर ट्रॅफिकचा केंद्रबिंदू बनला आहे. शहरातील नागरिक या ठिकाणी भाजी खरेदी करण्यासाठी येतात. या परिसरामध्ये प्राथमिक आणि माध्यमिक शाळा असल्यामुळे दुपारच्या सुमारास शाळेची सुट्टी झाल्यानंतर मोठी वाहतूक कोंडी होत आहे. विद्यार्थ्यांना वाहतूक कोंडीतून चालणे देखील अवघड झाले आहे. शाळेची सुट्टी झाल्यानंतर तीनशे ते चारशे विद्यार्थी शाळेमधून बाहेर पडतात. विद्यार्थ्यांची गर्दी, भाजी मंडीतील नागरिक आणि रस्त्यावरील वाहनांमुळे गर्दी होत आहे.
परिसरामधील सिग्नल अनेक दिवसांपासून कार्यरत नसल्यामुळे शाळेत येणाऱ्या विद्यार्थ्यांना छोट्यामोठ्या अपघाताला देखील तोंड द्यावे लागत आहे. त्यातच आधीच भाजी मंडी परिसरामध्ये असणारी ट्रॅफिक कोंडी व त्यामधूनच येणारे चारचाकी व मोठी वाहने मोठ्या प्रमाणातच ट्रॅफिक जाम करत आहे.
बीडमध्ये वडापावच्या किंमतीमध्ये मिळतोय पिझ्झा आणि बर्गर! Video
प्रशासनाशी पत्रव्यवहार
सिग्नल कार्यरत करणं हे बीड नगरपरिषदचे काम आहे. बीडच्या वाहतूक शाखेने भाजी मंडी परिसरातील अवैध असणारे अतिक्रमण आणि हातगाडे हटवण्यासाठी व सिग्नल पुन्हा कार्यरत करण्याची नगर परिषदेला पत्र पाठवले मात्र, अद्याप काम झाले नसल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस उपनिरीक्षक कैलास भारती यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.