बीड, 20 डिसेंबर : राज्यात ग्रामपंचायत निवडणुकीसाठी मतमोजणी सुरू आहे. ठिकठिकाणाहून निर्णय समोर येत आहे. बीडमध्ये भाजपच्या नेत्या पंकजा मुंडे आणि राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांच्यामध्ये जोरदार टक्कर पाहण्यास मिळाली. दोघांनीही आपला विजय झाला दावा केला असला तरी बीडमध्ये भाजपने सरशी केली आहे. त्यामुळे कार्यकर्त्यांनी एकच जल्लोष केला. यावेळी धनंजय मुंडेंनी कार्यकर्त्यांसोबत ठेका धरला.
बीडच्या परळी मतदारसंघात मुंडे बहीण भावाची प्रतिष्ठा पणाला लागलेल्या ग्रामपंचायती मधिल प्राथमिक निकाल हाती आले त्यामध्ये परळी मतदारसंघात पुन्हा एकदा राष्ट्रवादीने बाजी मारल्याचे चित्र पाहायला मिळाले आहे. सकारात्मक निकाल हाती येत असल्याने धनंजय मुंडे यांच्या घरासमोर विजयी जल्लोषाची तयारी करण्यात आली असून धनंजय मुंडे सहभागी झाल्याचे चित्र देखील पाहायला मिळाले.
बीड - ग्रामपंचायत विजयानंतर धनंजय मुंडेंनी धरला डिजेवर ठेका.. pic.twitter.com/8wDQZ70Onv
— News18Lokmat (@News18lokmat) December 20, 2022
वैद्यनाथ कारखाना,स्व गोपीनाथ मुंडे यांचे समाधीस्थळ ज्या ठिकाणी आहे. त्या पांगरी ग्रामपंचायतीसह महत्वाच्या अन् मोठ्या ग्रामपंचायत ताब्यात घेत भाऊ धनंजय मुंडे यांनी बहीण पंकजा मुंडे यांना मोठा धक्का दिला आहे.
परळी मतदारसंघात प्राथमिक अंदाजानुसार राष्ट्रवादी पार्टीला घवघवीत यश येत असल्याची कबुली राष्ट्रवादीचे नेते धनंजय मुंडे यांनी दिली आहे. परळी तालुकाच नाही तर जिल्ह्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीला कौल मिळत असल्याचे देखील त्यांनी सांगितले.
तर, परळीसह बीड जिल्ह्यातील सर्वाधिक ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात येतील असा विश्वास व्यक्त करत ग्रामपंचायतीच्या विजयाचा दावा भाजपनेच्या पंकजा मुंडे यांनी केला आहे. धनंजय मुंडे यांनी सर्वाधिक ग्रामपंचायत राष्ट्रवादीच्या येत असल्याचा दावा केला होता. परळी मतदार संघातील घाटनांदुरसह परळी मतदारसंघातील मोठ्या ग्रामपंचायत या भाजपच्या ताब्यात आला असल्याचं पंकजा मुंडे म्हणाल्या
मुंडे बहीण भावाच्या दावे प्रतिदावे यामुळे ग्रामपंचायती कुणाच्या ताब्यात हे अंतिम निकाल हाती आल्यानंतर समोर येणार आहे.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.