मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Video : नवरात्रीत उपवासाला भगर खरेदी करताय? अशी घ्या काळजी

Video : नवरात्रीत उपवासाला भगर खरेदी करताय? अशी घ्या काळजी

उत्सव काळात महिला नऊ दिवसांचे उपवास करतात. त्यामुळे या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलेली असते.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

बीड, 29 सप्टेंबर : देशभरात शारदीय नवरात्री महोत्सव सुरू झाला आहे. सगळीकडे उत्साह पाहायला मिळत आहे. उत्सव काळात महिला नऊ दिवसांचे उपवास करतात. त्यामुळे या काळात उपवासाच्या पदार्थांची मागणी वाढलेली असते. मात्र, उपवासाचे पदार्थ खरेदी करताना ग्राहकांनी विशेष खबरदारी घेणे जिल्ह्यात घडलेल्या विषबाधेच्या घटनेमुळे आवश्यक बनले आहे.

नवरात्र उत्सवात नऊ दिवस उपास करणाऱ्यांची संख्या मोठी आहे. या काळात भगरीच्या पिठाची दशमी खाल्ली जाते. मात्र, जिल्ह्यात मागील दोन दिवसांपूर्वी दशमी खाल्ल्याने दीडशेहून अधिक जणांना विषबाधा झाल्याच समोर आले. त्यामुळे भगर खरेदी करताना सावधगिरी बाळगणे आवश्यक आहे.

खरेदीपूर्वी घ्यायची काळजी

उपवासानिमित्त कोणत्याही दुकानातून भगर खरेदी करण्यापूर्वी भगर एफएसएसआय प्रमाणित असल्याची खात्री करावी, भगरीच्या पाकिटावर नोंदणीकृत एफएसएसआय क्रमांक नसेल तर त्याची खरेदी करू नये, उपवासामध्ये भगरीचे पीठ करून त्याची भाकरी करण्यास प्राधान्य दिले जाते. मात्र, भाकरी न करता भगरीला स्वच्छ धुऊन त्याची खिचडी करून खावी, शक्यतो भगरीच्या पिठाचा वापर एका दिवसात करावा, बाजारात खुल्या पद्धतीने भगरीच्या पिठाची विक्री होत असेल तर शक्यतो त्याची खरेदी करणे टाळावे, भगरीचे पीठ वापरायचेच असेल तर चांगल्या नामांकित कंपनीचे वापरावे, अशी माहिती अन्न औषध प्रशासनाच्या अधिकाऱ्यांनी दिली.

नवरात्रीत उपवास करताय? मग साबुदाणा खरेदी करताना लक्षात ठेवा या गोष्टी

अन्न औषध प्रशासन ॲक्शन मोडमध्ये

बीड जिल्ह्यात भगरीतून विषबाधा झाली. या घटनेनंतर अन्न औषध प्रशासनाने धाडी सत्र सुरू केले. बीडच्या मोंडा परिसरात तातडीने कारवाई करत मुंड्यातील एका व्यापाराकडे असणारा भगरीचा स्टॉक सील केला आहे. येथील भगरीचे सॅम्पल देखील हस्तगत करण्यात आले असून पुढील तपासणीसाठी पाठवण्यात आले आहेत.

पुण्यात भेसळयुक्त पनीर बनवणाऱ्या कारखान्यावर कारवाई, जाणून घ्या कशी ओळखायची पनीरमधील भेसळ

खुले पदार्थ टाळा

बीडमध्ये झालेल्या विषबाधेतील अनेकांनी भगरीच्या पीठाचे पदार्थ खाल्ले होते. भगरीतील भेसळ आणि त्याच्या सेवनाने नागरिकांना उलट्या, मळमळ, चक्कर येणे असे लक्षणे जाणवून आली होती. नागरिकांनी आरोग्य जपले पाहिजे. नामांकित कंपनीचेच सामान खरेदी केले पाहिजे. शक्यतो खूले मिळणारे पदार्थ टाळले पाहिजे अशी माहिती डॉ.अविनाश देशपांडे यांनी दिली. 

First published:

Tags: Beed, Beed news, Food, बीड