Home /News /maharashtra /

Beed : पावसाळापूर्व कामांकडे महावितरणकडून दुर्लक्ष; शहरातील कित्येक डीपींची झाकणे उघडीच, पाहा VIDEO

Beed : पावसाळापूर्व कामांकडे महावितरणकडून दुर्लक्ष; शहरातील कित्येक डीपींची झाकणे उघडीच, पाहा VIDEO

title=

शहरात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अनेक ठिकठिकाणी विद्युत डीपी बसविण्यात आले आहेत. अनेक भागातील डीपीच्या खालील फ्यूज बॉक्स हे सताड उघडे असल्याचे आढळून येते. विशेष म्हणजे हे बॉक्स जमिनीपासून अवघ्या तीन ते चार फुटाच्या अंतरावर बसवण्यात आलेले असतात. पावसाळ्यात या बॉक्स खालील बाजूस पाणी साठून परिसरात विद्युत करंट उतरण्याची शक्यता असते.

पुढे वाचा ...
  बीड, 11 जुलै : शहराच्या अनेक भागात विद्युत डीपी (Distribution Panel) उघड्या आहेत. उघड्या डीपींमुळे अपघातांची भीती निर्माण झाली आहे. शहरातील नागरिकांसह मोकाट जनावरांच्या जीवासही धोका निर्माण होण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या उघड्या डीपींकडे संबंधित विभागाचे दुर्लक्ष असल्याचे दिसून येत आहे. महावितरणकडून पावसाळापूर्वी डीपीची कामे केली जातात. मात्र, यंदा महावितरणकडून (Msedcl) याकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचे चित्र दिसून येत आहे. शहरातील काही मुख्य परिरातात नागरिकांची मोठी वर्दळ असते अशा ठिकाणचे डीपी देखील उघड्या अवस्थेत आहे.  शहरात वीज पुरवठा सुरळीत व्हावा यासाठी अनेक ठिकठिकाणी विद्युत डीपी बसविण्यात आले आहेत. अनेक भागातील डीपीच्या खालील फ्यूज बॉक्स हे सताड उघडे असल्याचे आढळून येते. विशेष म्हणजे हे बॉक्स जमिनीपासून अवघ्या तीन ते चार फुटाच्या अंतरावर बसवण्यात आलेले असतात. पावसाळ्यात या बॉक्स खालील बाजूस  पाणी साठून परिसरात विद्युत करंट उतरण्याची शक्यता असते. महावितरण वीजबिल वसुलीतच मश्गूल? उघड्या डीपीमुळे नागरिकांचा जीव धोक्यात असताना महावितरण फक्त थकीत वीजबिल वसुलीतच मश्गूल आहे की काय? असा प्रश्न नागरिक करीत आहेत. महावितरणाने पावसाळ्यापूर्वी जिल्ह्यातील सर्व विद्युत वाहिन्यासह त्या परिसरातील असणाऱ्या डीपी आणि त्याखालील फ्यूज बॉक्स तपासण्याची प्रामुख्याने आवश्यकता असते. मात्र सध्याचे चित्र पाहता याकडे दुर्लक्ष झाल्याचे दिसून येत आहे. वाचा- Beed : लाखो लोकांना शुद्ध पाणी पुरवणारी ‘जलशुद्धीकरण’ प्रक्रिया पाहिलीये का?, पाहा VIDEO
   शहरातील मुख्य परिसरात उघड्या डीपी
  शहरातील माने कॉम्प्लेक्स, नाट्यगृह रोड परिसर, शासकीय विश्रामगृह जालना रोड परिसर, सुभाष रोड परिसर, यासह मुख्य अभियंता यांच्या कार्यालयातील देखील फ्यूज बॉक्स उघडा असल्याचे दिसून आले आहे. या उघड्या बाॅक्समुळे दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही. रस्त्यावरील उघड्या रोहीत्रामुळे नागरिकांना रस्त्यावर चालणेही धोकादायक झाले आहे. ग्राहकांचे थकीत वीजबिल, तोडलेला वीजपुरवठा यांची इत्यंभूत माहिती ठेवणाऱ्या महावितरणकडून शहरातील उघडे फ्यूज बॉक्स आणि उघड्या वाहिन्यांबाबत काहीच कारवाई करताना दिसत नाही. नागरिक याबाबत संताप व्यक्त करत आहेत. उघड्या रोहीत्राबाबत बोलण्यास नकार पावसाळ्याच्या अनुषंगाने महावितरण तयार करीत आहे अशी प्रतिक्रिया महावितरणचे एक्झिक्युटिव्ह इंजिनिअर वाय बी निकम यांनी दिली. मात्र शहरातील ठिकठिकाणी दिसणाऱ्या उघड्या रोहित्राबाबत त्यांनी बोलण्यास नकार दिला.  वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO उघडे डीपी पाहता जीव मुठीत बीड शहरातील माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये नागरिकांची वर्दळ असते. परिसरात अनेक कोचिंग क्लासेस, महाविद्यालय आहे. विद्यार्थी आणि नागरिकांची वर्दळ असणाऱ्या या परिसरात महावितरणचे रोहित्र मात्र उघडे असून यामुळे नागरिकांना धोका आहे. येथील उघडे रोहीत्र पाहून आम्हाला भीती वाटते, इथून ये जा करतांना जीव मुठीत धरावा लागत असल्याचे विद्यार्थ्यांनी सांगितले.
  First published:

  Tags: Beed, Beed news, बीड, महावितरण

  पुढील बातम्या