Home /News /maharashtra /

Beed Snake Video : मोपेड चालू केली अन् हँडलजवळ दिसला साप थरकाप उडवणारा Video

Beed Snake Video : मोपेड चालू केली अन् हँडलजवळ दिसला साप थरकाप उडवणारा Video

बीड जिल्ह्यात एक विडिओ सोशल मीडियावर (Beed snake video social media viral) चांगलाच व्हायरल होत आहे. (Beed hoarer incident)

बीड, 13 जुलै : पावसाळ्यात गाडी चालवताना प्रत्येकाने लक्षात ठेवावी अशीच एक घटना घडली आहे. (Beed hoarer incident) बीड जिल्ह्यात एक विडिओ सोशल मीडियावर (Beed snake video social media viral) चांगलाच व्हायरल होत आहे. हा व्हिडिओ पाहून तुम्हालाही धक्का बसेल मोपेड चालू असताना मोपेड चालकाला हँडलजवळ साप दिसला. (snake in active bike) यावेळी वेळ बलवत्तर कोणताही धोका झाला नाही. दरम्यान ही थरकाप उडवणारी घटना बीडच्या अडस गावात (Beed adas village) उघडकीस आली आहे.

पुरुषोत्तम तागड हे दूध आणण्यासाठी शेतात गेले होते. तिथे त्यांनी गोट्याच्या बाजूला स्कुटी उभी केली होती. साधारणतः अर्ध्या तासानंतर ते दूध घेऊन घराकडे निघाले. एक किलोमीटर अंतरावर गेल्यानंतर त्यांच्या स्कुटीच्या समोरच्या डिग्गी मधून साप बाहेर आला. सुरुवातीला साप लहान दिसला, मात्र गाडी थांबविल्यानंतर साप हळूहळू बाहेर आला तेंव्हा साप मोठा असल्याचे दिसून आले. त्याला बाहेर काढून सोडून दिले.

हे ही वाचा : Sangli : लाट आली अन् दोघांना समुद्रात घेऊन गेली, 'त्या' व्हायरल व्हिडीओतील माणसं सांगलीची, LIVE VIDEO

दरम्यान या घटनेने प्रत्येकाने सावध राहण्याची वेळ आली आहे. वाहन सुरू करण्याआदी व्यवस्थित पाहूनच गाडी चालवावी अन्यथा आपल्यावरही प्रसंग येण्याची शक्यता आहे.

मराठवाड्यात 387 गावांना पुराचा फटका

दरम्यान, मराठवाड्यात 8 ते 10 जुलैला  झालेल्या जोरदार पावसानं 387 गावांना पुराचा वेढा पडला आहे. यात हिंगोलीतील 62, नांदेडमधील 310, बीडमधील 1, लातूरमधील 8, उस्मानाबादमधील 2 गावांचा समावेश आहे. या दोन दिवसात 160 मोठी, तर 30 लहान जनावरे दगावली आहेत, तर 52 हजार 149 हेक्टर खरिपाची पिके पाण्याखाली गेली आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Rains Update: राज्यात पावसाची संततधार सुरुच, पाच जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट; अनेक नद्यांना पूर

हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात सर्वाधिक नुकसान झालं असून, 10 हेक्टर शेतजमीन खरडून गेली आहे. 8 पुलांचे नुकसान झाले आहे. तर 5 लोकांचा मृत्यू झाला असून, यात बीड 4 तर नांदेडमध्ये 1 तर  4 जण जखमी झाले आहेत.

पाच जिल्ह्यामध्ये हवामान विभागाने रेड अलर्ट (Red Alert in five District) जारी केला आहे. यात पालघर, रायगड, नाशिक, कोल्हापूर, सातारा या जिल्ह्यांचा समावेश आहे. तर धुळे, जळगाव, अहमदनगर, औरंगाबाद, जालना, अमरावती, भंडारा, बुलडाणा, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांत यलो अलर्ट देण्यात आला आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्राच्या घाटमाथ्यावर जोरदार पाऊस झाला. पुढील चार दिवस जोरदार पावसाची शक्यता आहे.

Published by:Sandeep Shirguppe
First published:

Tags: Beed, Beed news, Snake, Snake video

पुढील बातम्या