मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमध्ये पोलीस अंमलदाराचा अल्पवयीन मुलीशी विवाह, मागील दीड वर्षांपासून केलं संतापजनक कृत्य

बीडमध्ये पोलीस अंमलदाराचा अल्पवयीन मुलीशी विवाह, मागील दीड वर्षांपासून केलं संतापजनक कृत्य

पोलीस अमलदाराकडून अल्पवयीन पत्नीचा छळ करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलीस अमलदाराकडून अल्पवयीन पत्नीचा छळ करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

पोलीस अमलदाराकडून अल्पवयीन पत्नीचा छळ करण्यात आल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid, India

बीड, 24 जानेवारी : राज्यात दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनांमध्ये वाढ होत आहे. अनैतिक संबंधातून हत्या, बलात्कार तसेच आत्महत्येच्याही घटना घडत आहेत. त्यातच आता बीड जिल्ह्यातून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. पोलीस अमलदाराकडून अल्पवयीन पत्नीचा छळ करण्यात आला. या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

काय आहे संपूर्ण प्रकरण -

बीडच्या गेवराईमध्ये ही धक्कादायक घटना घडली. सुशिक्षित लोकांकडून अल्पवयीन मुलीचा हा बालविवाह लावण्यात आला होता. याप्रकरणी 17 वर्षीय अल्पवयीन मुलीशी पोलिसाने विवाह केलाच कसा? असाही प्रश्न उपस्थित केला जात असून याप्रकरणी कारवाईची मागणी केली जात आहे.

अल्पवयीन विवाहितेचा पोलीस पती मागील दीड वर्षांपासून तिचा छळ करत असल्याची धक्कादायक घटना बीडच्या गेवराईत उघडकीस आली. पीडितेच्या फिर्यादीवरून पोलीस पती विरोधात गेवराई पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, विवाहिता 17 वर्षांची असूनही बालविवाहाचे कलम लावले नाही. विशेष म्हणजे ज्यांच्यावर कायदा राबविण्याची जबाबदारी आहे, त्या पोलिसानेच अल्पवयीन मुलीशी संसार थाटल्याने खळबळ उडाली आहे.

पोलीस अंमलदाराने अल्पवयीन मुलीशी विवाह केला असेल तर ते गंभीर आहे. यात माहिती घेऊन योग्य ती कायदेशीर कारवाई करण्याचे आदेश ठाणेप्रमुखांना दिले जातील, असे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले आहे.

हेही वाचा - थेट स्वयंपाक घरातच डल्ला, चोरट्यांनी दागिन्यांची पोटली केली लंपास 

उधारीचे 20 रुपये मागितले म्हणून चाकूनेच भोसकले, नागपूर हादरलं!

केवळ 20 रुपये उधारीवरुन झालेल्या वादातून चिकन विक्रेत्याने पाणीपुरी दुकानदाराला चाकूने भोसकल्याची धक्कादायक घटना नागपुरमधील जरीपटका परिसरात घडली आहे. या हल्ल्यात दुकानदार गंभीर जखमी झाला असून, त्याला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर दुकानदारावर हल्ला केल्यानंतर आरोपी पळून होता. याप्रकरणी जरीपटका पोलीस ठाण्यात हत्येच्या प्रयत्नाचा गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे. तसेच पोलिसांनी आरोपीला अटक केली आहे. क्षुल्लक कारणावरून घडलेल्या या घटनेमुळे परिसरात मात्र दहशतीचं वातावरण पसरलं आहे. या घटनेमुळे नागपुरातील कायदा आणि सुव्यवस्थेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.

First published:

Tags: Beed news, Crime news, Police