मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बीडमध्ये ग्रामसेवकाचं लज्जास्पद कृत्य, गतीमंद मुलगी पाणी भरत असताना संतापजनक प्रकार

बीडमध्ये ग्रामसेवकाचं लज्जास्पद कृत्य, गतीमंद मुलगी पाणी भरत असताना संतापजनक प्रकार

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

ग्रामसेवकाने एका 28 वर्षीय गतीमंद मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

बीड, 10 ऑगस्ट : महाराष्ट्रात पुन्हा एकदा महिला सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. महिलांच्या सुरक्षेसाठी पोलीस प्रशासन, सामाजिक संस्था सर्वोतोपरी प्रयत्न करत असले तरी आज महिला सुरक्षित नाहीत, हे वास्तव नाकारता येणार नाही. कारण राज्यात आणि देशात सातत्याने महिला अत्याचार किंवा विनयभंगाच्या बातम्या समोर येत आहेत. विशेष म्हणजे फक्त शहरीभागच नाही तर खेड्यागावातही महिला सुरक्षित नाहीत. बीडमधील एका गावात तर गतीमंदी मुलीचा विनयभंग झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. त्यामुळे या प्रकारावर संताप व्यक्त केला जातोय. ग्रामसेवकाने एका 28 वर्षीय गतीमंद मुलीचा विनयभंग केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे. संबंधित घटना ही बीडच्या गेवराई तालुक्यातील एका गावात घडली आहे. ग्रामसेवक पदावर कार्यरत असलेल्या आरोपीने हा गुन्हा केला आहे. या प्रकरणी पीडीत मुलीच्या आईच्या फर्यादीवरूण चकलांबा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे. (पोलीस सांगत तरुणीला अडकवले प्रेमाच्या जाळ्यात, नंतर लग्नाचे आमिष दिले अन्...) गतीमंद मुलगी पाणी आणण्यासाठी गेली होती. घराच्या हाकेच्या अंतरावर असताना गावचा ग्रामसेवक हा मोटार सायकलवर आला. त्याने मुलीचा विनयभंग केला. यावेळी मुलीने आरडाओरड केली असता ग्रामसेवकाने त्या ठिकाणावरूण पळ काढला. पीडितेने संबंधित घटनाक्रम तिच्या आईला सांगितला आणि त्यांनी याबाबत चकलांबा पोलीस ठाण्यात धाव घेतली. ग्रामसेवक ईस्माईल वजिर पठाण याच्या विरूद्ध चकलांबा पोलीस ठाण्यात विनयभंग आणि अन्य कलमान्वे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास चकलांबा पोलीस करत आहेत.
First published:

Tags: Beed, Beed news, Crime, Rape

पुढील बातम्या