मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : मांजरा नदीला प्रदूषणाचा विळखा पडण्याचं कारण झालं उघड

Beed : मांजरा नदीला प्रदूषणाचा विळखा पडण्याचं कारण झालं उघड

 प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मांजरा नदी प्रदूषित होत असून नदीपात्राचे डम्पिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मांजरा नदी प्रदूषित होत असून नदीपात्राचे डम्पिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे.

प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे मांजरा नदी प्रदूषित होत असून नदीपात्राचे डम्पिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे.

 • Local18
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  बीड, 20 डिसेंबर : ‘स्वच्छ भारत स्वच्छ शहर'चा नारा देत आपले शहर स्वच्छ ठेवण्याकडे शासन-प्रशासनाकडून आवाहन करण्यात येते. मात्र, परिसरातील नागरिक कचरा मांजरा नदीपात्रात आणून टाकतात. अशा नागरिकांमुळे आणि प्रशासनाच्या दुर्क्षक्षामुळे नदी प्रदूषित होत असून नदीपात्राचे डम्पिंग ग्राऊंड झाल्याचे चित्र आहे.

  बीड  जिल्ह्यातील पाटोदा तालुक्यातून मांजरा नदी वाहते.  मांजरा नदीपात्रात कचरा आणून टाकला जात आहे. येथील कचरा पाहता ही नदी आहे की, डम्पिंग ग्राऊंड असा प्रश्न उपस्थित होत आहे. नदीची स्वच्छता मोहीम नगरपरिषद अंतर्गत करण्यात आली. मात्र, सध्या ही नदी घाणीमुळे विद्रूप झाली आहे. येथील घाणीचा परिसरातील नागरिकांना त्रास होत आहे. नदीपात्रात घाण टाकणाऱ्या नागरिकांवर प्रशासनाने कारवाई करावी अशी मागणी स्थानिक नागरिक करीत आहेत. 

  स्मार्ट सिटीच्या कामाने सोलापूरकर त्रस्त, नवीन रस्त्याचे झाले हाल, Video

  नदी प्रदूषणाच्या विळख्यात

  नदीपात्रात मोठ्या प्रमाणात कचरा साठलेला आहे. यामुळे परिसरात कायम दुर्गंधी असते. कचऱ्यासोबतच कॅरिबॅग, कोंबडी, बकऱ्यांच्या उरलेल्या मासांचे अवशेष, सडलेले अन्न असा  कचरा देखील नदीत आढळतो. आज या नदीची अवस्था अतिशय बिकट झाली आहे. शहरातील घाण पाणी आणि कचरा टाकण्यासाठी या नदीचा वापर केला जात आहे. या बाजूच्या परिसरात तसेच मुख्य पुलावरून जाताना येताना देखील प्रचंड प्रमाणात दुर्गंधी येत आहे त्यामुळे या भागातील नागरिक इथून जाण्यासाठी टाळाटाळ करत आहेत.

  आधारप्रमाणेच काढा हेल्थ कार्ड, देशात कुठेही मिळेल उपचार!

   प्रशासनानं लक्ष द्यावे

  नगरपंचायतीने शहरातील विविध विकास कामावर लाखो रुपयांचा खर्च केला आहे. परंतु परिस्थिती जैसे तेच थेच आहे. निधी नदीच्या स्वच्छतेसाठी वापरला असता कदाचित अस्वच्छतेची वेळ आली नसती या परिस्थितीमुळे शहरात दुर्गंधी पसरली आहे. व अनेक छोटेमोठे व्यापारी व नागरिक याच नदीपात्रात कचरा टाकत आहेत. त्यामुळे प्रशासनाने या परिस्थितीकडे लक्ष देण्याची गरज असल्याचे स्थानिक नागरिक चांगदेव गीत्ते यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Beed, Local18