मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /स्पायडरमॅन, छोटा भीम ते पुष्पा! आकर्षक पतंगांनी सजलाय बाजार, Video

स्पायडरमॅन, छोटा भीम ते पुष्पा! आकर्षक पतंगांनी सजलाय बाजार, Video

X
फर्रा,

फर्रा, आधा, डुग्गा, भवरा, पावणा, खडाडंडा, तिरंगी अशा मजेशीर नावांचे रंगीबेरंगी पतंग बाजारात उपलब्ध आहेत.

फर्रा, आधा, डुग्गा, भवरा, पावणा, खडाडंडा, तिरंगी अशा मजेशीर नावांचे रंगीबेरंगी पतंग बाजारात उपलब्ध आहेत.

  • Local18
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    बीड, 06 जानेवारी : मकर संक्रांतीनिमित्त शहरात उत्साहाचे वातावरण आहे. बाजारात आकर्षक पतंग दाखल झाले असून खरेदी करण्यासाठी गर्दी दिसून येत आहे. यंदा बाजारात वेगवेगळ्या प्रकारच्या पतंगांची विक्रीही जोरात आहे. दरवर्षी बीडमध्ये संक्रांतीनिमित्त पतंगाची मोठी उलाढाल होत असते. बाजारातील पतंग खरेदीसाठी तरुण, बालकांमध्ये प्रचंड उत्साहाचे वातावरण आहे.

    मकर संक्रांतीनिमित्त बाजारपेठ खरेदीसाठी मोठी गर्दी वाढत आहे. मकर संक्रांत दिवशी पतंग उडवण्याची परंपरा अनेक वर्षांपासून चालत आलेली आहे. बीडमध्ये देखील ही परंपरा कायम असून लहान थोर पतंग उडवण्याचा आनंद घेतात. रंगीबेरंगी पतंग बाजारात दाखल झाले आहेत. शहरातील पेठ बीड भागामध्ये पतंग व्यवसाय करणारे मुख्य व्यापारी आहेत.

    अनेक वर्षांपासून संक्रांतीचा सण जवळ येतो तसे शहरातील पतंग उडवणारे पतंग प्रेमी पतंग खरेदीसाठी येथे खरेदीसाठी गर्दी करतात. मागील दोन वर्षांमध्ये कोरोनाचे सावट असल्यामुळे सण उत्सवावर निर्बंध होते. मात्र, यावर्षी निर्बंध हटवल्यामुळे नागरिक देखील आवडीने पतंगाची खरेदी करत आहेत.

    मजेशीर नावांचे पतंग 

    यावर्षी बाजारामध्ये नवनवीन व रंगीबेरंगी पतंग दाखल झाले आहेत. लहान मुलांना आकर्षित करणारी स्पायडरमॅन, छोटा भीम मोटू, पतलू, पुष्पा असे आकर्षक पतंग दाखल आहेत. फापडा खड्डा, डंडा, कनकौवा, फर्रा आधा, डुग्गा, भवरा, पावणा,  खडाडंडा, तिरंगी अशा मजेशीर नावांचे रंगीबेरंगी पतंग बाजारात उपलब्ध आहेत. यावर्षी पतंगाच्या किमतीमध्ये  काही प्रमाणात वाढ झाली असून दोन रुपयाला मिळणारा पतंग पाच रुपयापर्यंत पोहोचला आहे. बाजारामध्ये एक रुपयापासून ते दीडशे रुपयांपर्यंत पतंग उपलब्ध आहेत. आपल्या आवडीनुसार पतंग प्रेमी पतंग खरेदी करतात.

    मकर संक्रातीच्या तोंडावर कुंभार व्यावसायिक अडचणीत, पाहा Video

    यंदा किमती वाढल्या

    गेल्या पाच ते सहा दिवसापासून ग्राहकांची गर्दी होत असून, कच्च्या मालाच्या किमती वाढल्याने काही प्रमाणात पतंगाची किंमत यंदा वाढली आहे. यावर्षी बाजारपेठेमध्ये नवनवीन पतंगाच्या वेगवेगळे प्रकार दाखल झाले असून ग्राहकांचीही मागणी ही नवनवीन पॅटर्न असणाऱ्या पतंगाला असल्याचे पतंग विक्रेते अरुण पवार यांनी सांगितले. 

    First published:
    top videos

      Tags: Beed, Local18, Makar Sankranti 2023