मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed News: दुष्काळी बीडला माजलगाव धरण ठरतेय वरदान, शेतकऱ्यांना होतोय फायदा

Beed News: दुष्काळी बीडला माजलगाव धरण ठरतेय वरदान, शेतकऱ्यांना होतोय फायदा

मराठवाड्यातील जायकवाडीचा दुसरा टप्पा माजलगाव धरणाला मानला जातो. हे धरण बीडसह तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे.

मराठवाड्यातील जायकवाडीचा दुसरा टप्पा माजलगाव धरणाला मानला जातो. हे धरण बीडसह तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे.

मराठवाड्यातील जायकवाडीचा दुसरा टप्पा माजलगाव धरणाला मानला जातो. हे धरण बीडसह तीन जिल्ह्यासाठी वरदान ठरत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    रोहित देशपांडे, प्रतिनिधी

    बीड, 31 मार्च: मराठवाड्याला अनेकदा दुष्काळी परिस्थितीचा सामना करावा लागतो. बीड जिल्ह्याची ओळखही अवर्षग्रस्त जिल्हा अशीच आहे. बीडला अनेकदा पाणी टंचाईचा सामना करावा लागला आहे. जायकवाडी धरण मराठवाड्यासाठी वरदान मानले जाते. आता याच धरणाचा दुसरा टप्पा मानला जाणाऱ्या माजलगाव धरणामुळे शेतकऱ्यांना मोठा फायदा झाला आहे. माजलागाव तालुक्यातील तब्बल 75 टक्के जमीन ओलीताखाली आली आहे.

    माजलगाव धरण ठरतेय वरदान

    जायकवाडी धरणाचा दुसरा टप्पा मानल्या जाणाऱ्या माजलगाव धरणाची निर्मिती 1986 मध्ये पूर्ण झाली. त्यानंतर 1989 पासून धरणात प्रत्यक्ष पाणी साठवण्यात आले. या धरणाच्या निर्मितीमुळे बीड, परभणी, नांदेड या तीन जिल्ह्यांना फायदा झाला आहे. या जिल्ह्यांतील मोठे क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. बीडसह माजलगाव शहर व तालुक्यातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला आहे.

    सिंचन क्षेत्रात वाढ, शेतकऱ्यांना फायदा

    माजलगाव धरणामुळे जिल्ह्यातील सिंचन क्षेत्रात मोठी वाढ झाली आहे. तालुक्यातील 75 टक्के क्षेत्र सिंचनाखाली आले आहे. तसेच याचा भूगर्भातील पाणी पातळी वाढण्यासही फायदा झाला आहे. त्यामुळे याचा सर्वाधिक फायदा शेतकऱ्यांना होत आहे. पाणी उपलब्ध झाल्याने शेतकरी विविध पिकांचे उत्पादन घेत आहेत. त्याचा आर्थिक फायदाही होत आहे. तर महिलांची पाण्यासाठी होणारी पायपीट थांबली आहे.

    लघु उद्योग व रोजगारात वाढ

    माजलगाव धरणाचे पाणी कालव्याद्वारेही सोडले जाते. त्यामुळे शेतकऱ्याने ऊस, कापूस आदी व्यापारी पिके लावण्यास सुरुवात केली आहे. तसेच जिनिंग आणि अनेक छोटे-मोठे प्रकल्प देखील या परिसरामध्ये उभा राहिले आहेत. याच धरणाच्या पाण्यामुळे अनेकांना रोजगार देखील उपलब्ध झाला आहे. मागील काही वर्षांपासून सतत पडणाऱ्या पावसामुळे धरणाचा पाणीसाठा देखील मुबलक आहे.

    70 रु. किलो, वर्धा जिल्ह्यातील शेतकऱ्याने पिकवला काळा गहू; साधा गहू अन् यात काय आहे फरक?

    जिल्हे व क्षेत्र

    बीड 28 हजार 300 हेक्टर

    परभणी 58 हजार 358 हेक्टर

    नांदेड 7 हजार 200 हेक्टर

    माजलगाव प्रकल्प दृष्टीक्षेपात

    पाणलोट क्षेत्र 3840 वर्डा कि.मी.

    एकूण जलसाठा 450 दलघमी.

    उपयुक्त जलसाठा 312 दलघमी

    लागवडी योग्य लाभक्षेत्र 1 लाख 19 हजार 400 हेक्टर

    धरणाची लांबी सात हजार 488 मीटर

    नियोजनाद्वारे शेतकऱ्यांना पाणी पुरवठा

    मागील चार वर्षांपासून सतत पावसाने मोठ्या प्रमाणात हजेरी लावल्यामुळे चार वर्षांपासून धरणाचा पाणीसाठा हा 100% वर गेला आहे. याचा फायदा परिसरातील अनेक शेतकऱ्यांना देखील झाला असून कालव्यावाटे योग्य नियोजनाद्वारे शेतकऱ्यांपर्यंत पाणी पोहोचवले जाते, अशी माहिती विभागीय अभियंता प्रवीण चौगुले यांनी दिली.

    First published:
    top videos

      Tags: Beed, Beed news, Local18, Water crisis