मुंबई, 08 फेब्रुवारी : महाराष्ट्रात मागच्या दोन दिवसांपासून हवामानात बदल होत असल्याचे दिसून येत आहे. अचानक हवेतील गारवा कमी होऊन उष्णतेच्या प्रमामात वाढ झाली आहे. मागील दोन दिवसांत राज्याचा पारा 35 अंशांपर्यंत पोहोचला आहे. यामुळे पडलेली कडाक्याची थंडी कमी झाली आहे.
दरम्यान याचा परिणाम नागरिकांवर होत आहे. अचानक तापमान वाढल्यामुळे नागरिकांच्या आरोग्यावर परिणाम झाला आहे. दरम्यान पुढचा एक आठवडा उन्हाचा तडाखा बसण्याची शक्यता असल्याचे हवामान विभागाने माहिती दिली आहे.
हे ही वाचा : Beed: ऊसतोड कामगारांच्या बीड जिल्ह्यातच शेतकरी अडचणीत, 3 महिने उलटले तरी...
राज्यात गेले काही दिवसांपासून परतलेली थंडी हळूहळू कमी होऊ लागली आहे. किमान तापमानात वाढ होत असली तरी उत्तर महाराष्ट्रात गारठा कायम आहे. दरम्यान मागच्या 24 तासांत निफाड येथील गहू संशोधन केंद्रात राज्यातील निचांकी 8.3 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर जळगाव येथे तापमानाचा पारा 10 अंशांवर होता. राज्याच्या उर्वरित भागात बहुतांश ठिकाणी किमान तापमान 15 अंशांपर्यंत पोहोचले आहे.
निरभ्र आकाश होताच राज्यात उन्हाचा चटका आणि उकाडा वाढला आहे. तापमानातील तफावत वाढल्याने पहाटे गारठा तर दुपारी उन्हाचा तडाखा अशी स्थिती अनुभवायला येत आहे. कमाल आणि किमान तापमानात 13 ते 24 अंशांपर्यंत तफावत नोंदली जात आहे. दरम्यान विदर्भातील ब्रह्मपूरू येथे राज्यातील उच्चांकी 35.6 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली. तर अमरावती आणि सोलापूर येथेही कमाल तापमान 35 अंशांवर नोंद झाली.
आठवडाभरापासून उन्हाचा तडाखा वाढला आहे. मंगळवारी कमाल तापमानात 1 अंशाने वाढ होऊन पारा 33.6 अंशांवर गेला होता; तर किमान तापमानातही 2 अंशांची वाढ होऊन पारा 17.8 अंशांवर स्थिरावला होता. निरभ्र आकाश आणि वाढते तापमान, यामुळे उन्हाची तीव्रता जाणवत आहे. पुढील चार दिवस असेच वातावरण राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तविण्यात आला आहे.
हे ही वाचा : TCS ची नोकरी सोडून पठ्ठ्यानं सुरू केली शेती, आज करतोय लाखोंची उलाढाल
दरम्यान राज्यात मागच्या 24 तासांत पुणे 34.1 (11.5), जळगाव 33.7 (10.0), धुळे 31.5 (12.5), कोल्हापूर 33.6 (17.8), नाशिक 31.9 (12.9), सांगली 33.8 (17.2), सातारा 33.3 (14.4), सोलापूर 35.4 (17.6), रत्नागिरी 33.0 (18.5), औरंगाबाद 32.2 (12.6), नांदेड 33.2 (16.6), परभणी 33.5(15.3), अकोला 35.0(14.3), अमरावती 33.8(12.5), बुलडाणा 32.0(15.8), चंद्रपूर 32.2 (13.0), गडचिरोली 31.0 (11.8), गोंदिया 32.8 (13.2), नागपूर 32.1 (13.3), वर्धा 33.0 (15.4), वाशिम 33.2 (16.8), यवतमाळ 33.5 (14.5) तापमानाची नोंद झाली.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.
Tags: Heat, Maharashtra News, Summer, Summer hot, Summer season, Weather Update, Weather Warnings