मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Maharashtra Karnataka Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे अद्यापही पडसाद, सीमाभागातील लोकांचा धोकादायक प्रवास

Maharashtra Karnataka Dispute : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे अद्यापही पडसाद, सीमाभागातील लोकांचा धोकादायक प्रवास

बीडमधून कर्नाटकला जाण्यासाठी खाजगी प्रवास बंद असल्याने बीड बसस्थानकातून कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांनी रात्री एकच गर्दी होत आहे.

बीडमधून कर्नाटकला जाण्यासाठी खाजगी प्रवास बंद असल्याने बीड बसस्थानकातून कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांनी रात्री एकच गर्दी होत आहे.

बीडमधून कर्नाटकला जाण्यासाठी खाजगी प्रवास बंद असल्याने बीड बसस्थानकातून कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांनी रात्री एकच गर्दी होत आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India

बीड, 23  डिसेंबर : महाराष्ट्र कर्नाटक सीमावादाचे अद्यापही पडसाद उमटत आहेत. बीडमधून कर्नाटकला जाण्यासाठी खाजगी प्रवास बंद असल्याने बीड बसस्थानकातून कर्नाटकला जाण्यासाठी प्रवाशांनी रात्री एकच गर्दी होत आहे. बसमध्ये जवळपास 100 च्या वर प्रवाशांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. मिळेल तिथे उभा राहून दोन हाताने लटकून प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन कर्नाटक सरकारच्या बस मध्ये प्रवास करत आहेत.

विशेष म्हणजे यावेळी बसमध्ये मेंढरं कोंडल्यासारखे प्रवासी उभे होते. हा धक्कादायक प्रकार न्युज 18 लोकमतच्या कॅमेऱ्यात कैद झाला आहे. कर्नाटक महाराष्ट्र सीमा वादा नंतर खाजगी वाहने जाण्यास मनाई करत असल्याने बसमध्ये गर्दी होत असल्याचे प्रवाशांनी सांगीतले.

हे ही वाचा :  Live Update: भाजप नेते मोहित कंबोज यांना दिलासा; त्या प्रकरणात क्लीन चीट

तर यावेळी प्रवाशांना विचारलं असता यातील अनेक प्रवशी हे ऊसतोड कामगार असल्याचं समोर आलं आहे. ऊसतोडीच्या 6 महिन्याच्या काळात कामगारांना असाचं प्रवास करावा लागत असल्याचं देखील काहींनी सांगितले आहे. त्यामुळे महाराष्ट्र सरकारने ऊसतोडीच्या या 6 महिन्याच्या कार्यकाळात कर्नाटकला विशेष बस सोडाव्यात. अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.

संजय राऊतांचे कर्नाटकच्या मुख्यंत्र्यांना सडेतोड उत्तर

महाराष्ट्र आणि कर्नाटक सीमावादावरून शाब्दिक युद्ध तीव्र झाले आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री बसवराज बोम्मई यांनी उद्धव ठाकरे गटातील शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर निशाणा साधत त्यांना देशद्रोही म्हटले आहे. यावर आता शिवसेना खासदार संजय राऊत यांनीही सडेतोड उत्तर दिले आहे. बोम्मई जर आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील तर चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादमध्ये बोलवून, झोपाळ्यावर बसवून, पापडी गाठ्या खाऊ घालणाऱ्यांना काय म्हणणार असे म्हणत राऊत यांनी बोम्मईंसोबत नरेंद्र मोदींवर टीका केली आहे.

हे ही वाचा : भुखंडावरून शिंदेंना अडचणीत कोण आणतंय? फडणवीसांचं नाव घेत राऊतांनी सांगितली Inside Story

राऊत पुढे काय म्हणाले, बोम्मई जर आम्हाला चीनचे एजंट म्हणत असतील तर चीनच्या पंतप्रधानांना अहमदाबादमध्ये बोलवून, झोपाळ्यावर बसवून, पापडी गाठ्या खाऊ घालणाऱ्यांना काय म्हणणार असे राऊत म्हणाले. आम्हाला बेसावध ठेवून कर्नाटक घुसखोरी करतोय. हे चीन सारखंच करताहेत. महाराष्ट्र कर्नाटक सीमा वादात तेल आणि आग लावण्याचे काम बोम्मई करताहेत. ते आमचे संस्कार आणि संस्कृती काढताहेत. असेही राऊत म्हणाले.

First published:

Tags: Karnataka, Maharashtra News