मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed News : सरकारी अधिकाऱ्यानं हाती घेतलं पाणी वाचवण्याचं मिशन, काम पाहून वाटेल अभिमान, Video

Beed News : सरकारी अधिकाऱ्यानं हाती घेतलं पाणी वाचवण्याचं मिशन, काम पाहून वाटेल अभिमान, Video

X
बीड

बीड जिल्ह्यातील जल प्राधिकरणमध्ये काम करणारे अधिकारी मधुकर वाघ यांनी तब्बल 498 रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.

बीड जिल्ह्यातील जल प्राधिकरणमध्ये काम करणारे अधिकारी मधुकर वाघ यांनी तब्बल 498 रेन वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प पूर्ण केले आहेत.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  रोहित देशपांडे, प्रतिनिधी

  बीड, 29 मार्च: मराठवाड्याला सातत्याने दुष्काळाचा सामना करावा लागतो. विशेषत: बीड जिल्ह्याचा पाणीप्रश्न सातत्याने डोके वर काढत असतो. राज्य सरकार पाणी प्रश्नासाठी 'पाणी आडवा, पाणी जिरवा' सारख्या विविध योजना राबवत असते. आता रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी सरकार प्रयत्नशील आहे. अशात बीडमधील एका अधिकाऱ्याने कौतुकास्पद कामगिरी केली आहे. बीड येथील जल प्राधिकरण विभागात काम करणारे मधुकर वाघ यांनी तब्बल 498 रेन वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प पूर्ण केले आहेत.

  दुष्काळी भागात विविध योजना

  राज्य शासनाच्या स्तरावरून दुष्काळी भागात पाणीप्रश्नासाठी विविध प्रकल्प आणि योजना राबविल्या जातात. दुष्काळी जिल्ह्यांमध्ये पाणी आडवा, पाणी जिरवा सारख्या अनेक योजना राबवल्या जात आहेत. यातच बीड जिल्ह्यात देखील वाटर हार्वेस्टिंग हा प्रकल्प राबवला जातोय. याचा फायदाही आता बीड वासियांना होत आहे.

  मधुकर वाघ यांचे कौतुकास्पद काम

  आपण शासकीय कर्मचाऱ्यांच्या कामाच्या पद्धतीबाबत अनेकदा ओरड ऐकली असेल. परंतु, काही शासकीय कर्मचारी व अधिकारी आपल्या कर्तृत्वाने वेगळा आदर्श प्रस्थापित करत असतात. बीडमधील जल प्राधिकरण विभागात कार्यरत असणारे मधुकर वाघ हे यापैकीच एक आहेत. त्यांनी संपूर्ण जिल्ह्यात वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प राबविण्यासाठी पुढाकार घेतला. तसेच बीड शहरात तब्बल 498 वॉटर हार्वेस्टिंगचे प्रकल्प पूर्ण केले आहेत. त्यामुळे कायमची पाणीटंचाईवर मात केली आहे.

  वाघ यांनी स्वत:पासून केली सुरुवात

  बीडमध्ये 2005 च्या दुष्काळाचे चटके बसले होते. यातूनच वाघ यांना वाॉटर हार्वेस्टिंगची कल्पना सुचली. त्यांनी वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्पाची सुरुवात स्वतःपासून केली. घरातील पाणी टंचाईचा प्रश्न कायमचा मार्गी लावला. त्यामुळे आता अनेक शासकीय कार्यालय यासह शैक्षणिक संस्था हा प्रकल्प राबवण्यासाठी पुढाकार घेत आहेत.

  Latur News: लातूरमध्ये चक्क उन्हाळी सोयाबीन, शेतकऱ्याच्या प्रयोगाची चर्चा तर होणारच! पाहा Video

  काय आहे वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प?

  पावसाचे पाणी हे नाल्यावाटे वाहून जाते. मात्र वॉटर हार्वेस्टिंग करून हे पाणी बोर अथवा पाण्याचे सोर्स या ठिकाणी सोडले जाते. याचा फायदा पाण्याची पातळी वाढण्यासाठी होतो. ज्या ठिकाणी पाण्याची समस्या जाणवते त्या ठिकाणी पाणी सहज उपलब्ध होते.

  कसा राबवतात वॉटर हार्वेस्टिंग प्रकल्प?

  रेन वॉटर हार्वेस्टिंगसाठी 5×5 चा खड्डा खोदून नदीतील गोटे दीड फूट खड्डात टाकावे. एक ते दीड इंच खडी, पाच किलो कोळसा, रोडा खडी वापरली जाते. छतावरून आलेल्या पाईपला फिल्टरेशनसाठी जाळी आणि त्या पाईपला छोटे छोटे छिद्र पाडावेत आणि ते पाणी बोरमध्ये किंवा विहिरीत मुरवले जाते.

  First published:
  top videos

   Tags: Beed, Beed news, Local18, Water