Beed : पोरांनो, लक्ष द्या! कर्णकर्कश आवाजाच्या गाड्या चालवून इतरांना त्रास देऊ नका, VIDEO
Beed : पोरांनो, लक्ष द्या! कर्णकर्कश आवाजाच्या गाड्या चालवून इतरांना त्रास देऊ नका, VIDEO
कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकींमुळे नागरिक त्रस्त
वाहनाच्या सायलेन्सरमधून निघणारा कर्णकर्कश आवाज कमी की काय म्हणून अधूनमधून फटाक्यासारखे आवाज देखील दुचाकीमधून काढता येऊ लागले आहे. तरुणांमध्ये गाडी मॉडिफाईड करून असा काही तरी नवीन प्रकार करण्याचे क्रेझ अधिक आहे.
बीड, 16 जुलै : बीड शहरातल्या मुख्य रस्त्यावरून धावणाऱ्या मॉडिफाईड दुचाकी (Modify bikes) ध्वनी प्रदूषणाचे (Noise pollution) कारण बनत आहेत. याच गाड्यांमधून निघणाऱ्या कर्णकर्कश आवाजाचा त्रास फक्त रस्त्यावरून चालणाऱ्या लोकांनाच नाही, तर घरातील लहान मुलांना आणि शाळेत शिकणाऱ्या विद्यार्थ्यांना देखील सहन करावा लागत आहे. एवढेच नाही तर रुग्णालयामध्ये उपचार घेणाऱ्या रुग्णांना देखील आवाजाचा त्रास होत आहे.
वाहनाच्या सायलेन्सरमधून निघणारा कर्णकर्कश आवाज कमी की काय म्हणून अधूनमधून फटाक्यासारखे आवाज देखील दुचाकीमधून काढता येऊ लागले आहे. तरुणांमध्ये गाडी मॉडिफाईड करून असा काही तरी नवीन प्रकार करण्याचे क्रेझ अधिक आहे. मात्र, याचा त्रास इतरांना सहन करावा लागत आहे. कर्णकर्कश आवाजाच्या दुचाकी घेऊन बीड शहरातल्या रस्त्यावरून फिरताना तरुण पाहायला मिळतात. याच हुल्लड बाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.
सायलेन्सरमध्ये छेडछाड विद्रूप आवाजशहरातील भाजी मंडी परिसर, माने कॉम्प्लेक्स परिसरात शाळा, महाविद्यालये आहेत. परिसरात हुल्लड तरूण कर्णकर्कश आवाज करीत गाड्यांवरून चकरा मारतात. यामुळे शाळा आणि महाविद्यालयातील विद्यार्थ्यांना त्रास सहन करावा लागतो. वाहतूक पोलीस हुल्लडबाजी करणाऱ्या तरुणांवर कारवाई करतील म्हणून असे बाईक स्वार शहरातील मुख्य रस्त्यावरून न फिरता पळवाटा शोधत उप रस्त्याने जातात. दुचाकीतील सायलेन्सरमध्ये छेडछाड करून त्याचा विद्रूप आवाज तयार करणाऱ्या गॅरेज चालकांवर देखील पोलिसांची कारवाई करण्याची मागणी नागरिक करीत आहेत. हेही वाचा-Osmanabad : ग्रुप ग्रामपंचायतमधील छोट्या गावाला दुजाभाव; रस्ता, वीज, पाण्यामुळे नागरिक त्रस्त“आभ्यासातून दुर्लक्ष होते”माने कॉम्प्लेक्स परिसरामध्ये आमचे ट्यूशन क्लासेस आहेत. या परिसरात मोठ्या आवाजाच्या गाड्या चकरा मारत असतात. याचा आम्हाला त्रास होतो. मोठ्या आवाजामुळे आमचे अभ्यासातून दुर्लक्ष होत असल्याचे वैष्णवी उबाळे या विद्यार्थिनीने सांगितले.“शाळा, महाविद्यालय परिसरात विशेष लक्ष”कर्णकर्कश आवाजाच्या गाड्या फिरवणाऱ्या चालकांवर आम्ही लक्ष ठेवून आहोत. यासह शाळा, महाविद्यालय परिसरात आमचे विशेष लक्ष असल्याचे वाहतूक शाखेचे पोलीस निरीक्षक भागवत फुंदे यांनी सांगितले. मोठ्या आवाजाने कानामधील नस कमजोर होण्याची भीतीकर्णकर्कश आवाज कानावर सतत पडत राहिला तर कानामधील नस कमजोर होते. परिणामी कानांना ऐकू कमी येते. कानाला मशीन लावण्याची देखील गरज भासू शकते असे कान, नाक घशाचे डॉक्टर रवींद्र घुमरे यांनी सांगितले.
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर.
आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.