मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Kojagiri Purnima : कोजागरीसाठी दूध खरेदी करताय? भेसळ ओळखण्यासाठी वापरा घरगुती टिप्स, Video

Kojagiri Purnima : कोजागरीसाठी दूध खरेदी करताय? भेसळ ओळखण्यासाठी वापरा घरगुती टिप्स, Video

X
कोजागिरी

कोजागिरी पौर्णिमेला दुधाची मोठी मागणी वाढते. अशावेळी दुधात भेसळ करून विक्रीची शक्यता नाकारता येत नाही.

कोजागिरी पौर्णिमेला दुधाची मोठी मागणी वाढते. अशावेळी दुधात भेसळ करून विक्रीची शक्यता नाकारता येत नाही.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Bid (Beed), India

    बीड, 8 ऑक्टोबर : कोजागरी पौर्णिमेला चंद्राला दूध-साखरेचा नैवेद्य दाखवला जातो. त्यामुळे कोजागिरी पौर्णिमेला दुधाची मोठी मागणी वाढते. अशावेळी दुधात भेसळ करून विक्रीची शक्यता नाकारता येत नाही. अशा भेसळयुक्त दुधामुळे शरीरावर विपरीत परिणाम होऊ शकतात. आजकाल पॅकेज्ड दुधातही कृत्रिम भेसळ केली जात आहे. त्यामुळे आज आपण दुधाच्या गुणवत्तेबद्दल घरगुती सोप्या टिप्स वापरून भेसळ कशी ओळखायची हे जाणून घेऊया.

    अशी ओळखा भेसळ

    दुधामध्ये चार थेंब आयोडीनचे टाका आणि दुधाचा रंग जर निळा झाला असेल तर हे भेसळयुक्त दूध आहे हे निष्पन्न होते. जर तुमच्या दुधात भेसळ असेल किंवा त्यात कोणत्याही प्रकारचे सिंथेटिक असेल. तर दुधाचा वास घेऊन तुम्ही याबद्दल जाणून घेऊ शकता. जर दुधात सिंथेटिकची भेसळ झाली असेल. तर अशा परिस्थितीत, आपण त्याच्या खराब चव आणि वासाने याबद्दल सहजपणे शोधू शकता. 

    जमिनीवर निशाण सोडणारे दूध भेसळीचे

    दुधाचे 2-3 थेंब एका साध्या पृष्ठभागावर टाकून जर दूध हळूहळू सरकले आणि मागे एक निशाण सोडले तर दूध शुद्ध आहे, जर दूध पृष्ठभागावर पडल्यानंतर कोणत्याही प्रकारचे निशाण सोडत नसल्यास या स्थितीत तुमच्या दुधात भेसळ झाली आहे, असं समजा.

    Kojagiri Purnima : तुळजाभवानीच्या दर्शनाची आस... 4 वर्षांची चिमुकली पायी करतेय प्रवास, Video

    भेसळीचे दूध उकळल्यावर पडते पिवळे

    दूध साठवल्यावर त्याचा रंग बदलत नाही. तर दुसरीकडे भेसळीचे दूध काही काळानंतर पिवळे होते. जेव्हा आपण दूध उकळतो तेव्हा त्याचा रंग बदलत नाही, मात्र भेसळीचे दूध उकळल्यावर ते पिवळे होते. दूध खरेदी करताना काळजी घेणे आवश्यक आहे. जर भेसळयुक्त दूध आढळले तर अन्न औषध प्रशासनाशी संपर्क करा असे आवाहन अधिकारी इम्रान हाश्मी यांनी केले आहे.

    First published:

    Tags: Beed, Beed news, दूध, बीड