मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

बापरे! पठ्ठ्याने ट्रॅक्टरमधून धावत्या एसटी बसवर मारली उडी, शेवट झाला भयंकर

बापरे! पठ्ठ्याने ट्रॅक्टरमधून धावत्या एसटी बसवर मारली उडी, शेवट झाला भयंकर

बीडममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटीवर ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या तरुणाने उडी मारली .

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Aurangabad [Aurangabad], India
  • Published by:  Ajay Deshpande

बीड : बीडममधून एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. बीडच्या माजलगाव तालुक्यातील शृंगारवाडी फाट्याजवळ दोन ट्रॉल्या घेऊन भरधाव वेगाने जात असलेल्या ट्रॅक्टरला ओव्हरटेक करणाऱ्या एसटीवर ट्रॅक्टरमध्ये बसलेल्या तरुणाने उडी मारली . मात्र ही स्टंटबाजी त्याच्या जीवावर बेतली आहे. उडी मारताना त्याचा तोल गेल्यानं तो एसटीला धडकून रोडवर जोरात पडला. आदळल्यानं या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे. गजानन मारोती बनाईत असं या मृत तरुणाचं नाव आहे. त्याने उडी का मारली हे मात्र अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र स्टंटबाजी करण्यासाठी या तरुणाने उडी मारली असवी असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे.

बसला धडकून  मृत्यू  

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, सिरसदेवीहून दोन ट्रॉल्या असलेले ट्रॅक्टर कोळसा घेऊन माजलगावकडे जात होते . यावेळी पाठीमागून आलेली कल्याण- वसमत बस क्रमांक ( एम.एच . 20 बी.एल. 4488 ) या बसच्या चालकाने संबंधित ट्रॅक्टरला ओव्हरटेक केले. मात्र याचवेळी  ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये बसलेल्या गजानन मारोती बनाईत वय 32 वर्ष  रा. शुक्लतीर्थ लिमगाव ता . माजलगाव या तरुणाने धावत्या बसवर उडी मारली. मात्र ही उडी मारताना त्याचा तोल गेला आणि तो बसच्या डाव्या बाजूला जावून आदळला. त्यानंतर तो रोडवर पडला. आदळल्याने त्याच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली, या अपघातामध्ये त्याचा जागीच मृत्यू झाला आहे.

हेही वाचा :  आणखी एक नेता शिंदे गटाच्या गळाला; उद्धव ठाकरेंना मोठा धक्का!

स्टंटबाजी जीवावर बेतली? 

दरम्यान या तरुणाने चालत्या टॅक्टरमधून बसवर उडी का घेतली हे अद्याप स्पष्ट होऊ शकलेलं नाही. मात्र स्टंट करण्याच्या विचारातून त्याने हे कृत्य केलं असावं असा अंदाज बांधला जात आहे. मात्र ही स्टंटबाजी या तरुणाच्या जीवावर बेतली आहे. बसला धडकल्यानं या तरुणाचा जागीच मृत्यू झाला आहे.

First published:

Tags: Beed, Beed news, St bus