मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Video : मोठ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!, 1000 तरुणांना मिळणार अपॉइंटमेंट लेटर

Video : मोठ्या कंपनीत नोकरीची सुवर्णसंधी!, 1000 तरुणांना मिळणार अपॉइंटमेंट लेटर

X
एक

एक हजार पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात मोठ्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

एक हजार पेक्षा अधिक रिक्त पदे भरली जाणार आहेत. यात मोठ्या नामांकित कंपन्यांचा सहभाग असणार आहे.

 • News18 Lokmat
 • Last Updated :
 • Bid (Beed), India

  बीड, 02 नोव्हेंबर : स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचे औचित्य साधून बेरोजगारांना रोजगाराची संधी उपलब्ध झाली आहे. कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र, बीड यांच्यामार्फत एक हजाराहून अधिक बेरोजगारांना रोजगार मिळणार आहे. कोरोना काळात अनेकांनी नोकरी गमावली होती. यातच आता मोठ्या नोकरीची संधी उपलब्ध झाली आहे. 

  पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळाव्याचे बीडमध्ये आयोजन करण्यात आले आहे.  03 नोव्हेंबर 2022 रोजी गुरुकुल इंग्लिश स्कूल, गुरुकुल नगर, शांताई हॉटेल मागे, काझी नगर जवळ, जालना रोड, बीड येथे हा मेळावा असणार आहे.

  माध्यमिक शिक्षक (गणित) एकूण पदे-03 शैक्षणिक पात्रता- पदवी, बी.एड, बी.एस.सी. वयोमर्यादा -18 ते 58 2) माध्यमिक शिक्षक (विज्ञान) एकूण पदे-03 शैक्षणिक पात्रता- बी.एस.सी. बी.एड वयोमर्यादा-18 ते 58, 3) कॉम्प्युटर (शिक्षक) एकूण पदे- 02 शैक्षणिक पात्रता-बी.एस.सी. कॉम्प्युटर सायन्स वयोमर्यादा-18 ते 58 4) टेलि कॉलर एकूण पदे - 02 शैक्षणिक पात्रता - कोणत्याही शाखेची पदवी वयोमर्यादा - 21 ते 45 जॉब लोकेशन बीड.

  जे बी एन इंजिटेक प्रा. लि. 

  1) क्वालिटी इंजिनिअर एकूण पदे-15 शैक्षणिक पात्रता- डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंग वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन पुणे, 2) सी.एन.सी. ऑपरेटर एकूण पदे-25 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी, आयटीआय (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिकल) वयोमर्यादा-18 ते 25 जॉब लोकेशन बीड, 3) व्ही.सी.एम. ऑपरेटर एकूण पदे–25 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी, आयटीआय (फिटर, वेल्डर, इलेक्ट्रिकल) वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन पुणे.

  दिशा सर्व्हिसेस औरंगाबाद

  1) हेल्पर एकूण पदे-60 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी वयोमर्यादा-18 ते 35, 2) सिक्युरिटी गार्ड एकूण पदे- 50 शैक्षणिक पात्रता- दहावी, बारावी वयोमर्यादा-22 ते 45 जॉब लोकेशन औरंगाबाद. 

  टॅलेनसेतु सर्व्हिस. प्रा. लि., ठाणे

  1) मेकॅनिक ऑपरेटर एकूण पदे- 20 शैक्षणिक पात्रता- आय.टी.आय (फिटर,वेल्डर,मेकॅनिकल), डीप्लोमा (फिटर,वेल्डर,मेकॅनिकल), वयोमर्यादा-18 ते 30, 2) असेम्बली लाईन ऑपरेटर एकूण पदे- 20 शैक्षणिक पात्रता- पदवी, बी.एस.सी. वयोमर्यादा-18 ते 30 जॉब लोकेशन पुणे/ठाणे.

  क्रेडिट ॲक्सेस ग्रामीण लि. बीड

  केंद्र मॅनेजर एकूण पदे–150 शैक्षणिक पात्रता- बारावी वयोमर्यादा-18 ते 29 जॉब लोकेशन औरंगाबाद /बीड.

  वायरलेस जॉब्स कंसल्टन्सी

  1) रिलेशनशिप मॅनेजर, कॅशियर (ICICI) बँक एकूण पदे–220 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 55, 2) बीझीनेस डेव्हलपमेंट एक्झीक्युटीव (HDFC) बँक एकूण पदे–200 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 55, 3) असोसिएट मॅनेजर (HDFC LIFE) एकूण पदे- 10 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 50, 4) ब्रँच रिलेशनशिप मॅनेजर एस बी आय (SBI) एकूण पदे-100 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 55,5) असिस्टंट मॅनेजर (Axis Bank) एकूण पदे–50 शैक्षणिक पात्रता- पदवी वयोमर्यादा-26 ते 50 जॉब लोकेशन संपुर्ण महाराष्ट्रात.

  हर्षवर्धन सेवाभावी संस्था, बीड

  सिक्युरिटी गार्ड एकूण पदे–10 शैक्षणिक पात्रता- दहावी वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन बीड. 

  द कुटे ग्रुप, बीड

  1) बॉयलर अंटेंडट एकूण पदे-02 शैक्षणिक पात्रता- दहावी उत्तीर्ण व बॉयलर ॲटेंडंट वयोमर्यादा-18 ते 35, 2) रिफायनरी ऑपरेटर एकूण पदे-03 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी वयोमर्यादा-18 ते 35,3) प्लांट ऑपरेटर एकूण पदे–03 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी व ॲसिड प्लांट ऑपरेटर वयोमर्यादा-18 ते 35, 4) केमिस्ट एकूण पदे–04 शैक्षणिक पात्रता- बी.एस.सी/एम.एस.सी केमिस्ट्री वयोमर्यादा-18 ते 35, 5) इलेक्ट्रीशिअन एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- दहावी/ बारावी, आयटीआय इलेक्ट्रिकल, डीप्लोमा इन इलेक्ट्रिकल इंजिनिअरींग वयोमर्यादा-18 ते 35, 6) सेल्स कॉरडीनेटर एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- कॉमर्स मधील पदवी वयोमर्यादा-18 ते 35, 7) ड्रायर ऑपरेटर एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- दहावी व बॉयलर ॲटेंडंट वयोमर्यादा-18 ते 35, 8) एक्सपेलर मशिन ऑपरेटर एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी वयोमर्यादा-18 ते 35, 9) वेट ब्रीज ऑपरेटर एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- बी.कॉम. वयोमर्यादा-18 ते 35, 10), कर्मशिअल ऑपरेटर एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- बी.कॉम. वयोमर्यादा-18 ते 35, 11) अकांउटंट एकूण पदे–01 शैक्षणिक पात्रता- कॉमर्स मधील पदवी वयोमर्यादा-18 ते 35 जॉब लोकेशन बीड.

  कॅम्पस प्लेसमेंटमध्ये जॉब मिळाला नाही? टेन्शन घेऊ नका; 'या' वेबसाईट्स लगेच देतील नोकरी

  ऑरिक ग्रीन, औरंगाबाद

  1) हेड प्लांट एकूण पदे- 02 शैक्षणिक पात्रता- बी.ई./बी.टेक. मेकॅनिकल मेकॅनिकल वयोमर्यादा-18 ते 40, 2) प्रोजेक्ट मॅनेजर एकूण पदे–04 शैक्षणिक पात्रता- बी.ई./बी.टेक. मेकॅनिकल, बी.ई. /बी.टेक. सिव्हिल वयोमर्यादा-18 ते 40, 3) स्टोअर मॅनेजर एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- कोणतीही पदवी वयोमर्यादा-18 ते 40, 4) स्टोअर असिस्टंट एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- कोणतीही पदवी वयोमर्यादा-18 ते 40, 5) मशिन मेंटेनन्स एकूण पदे–02 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी व मेकॅनीक मशीन टुल मेंटेनन्स, बी.ई./बी.टेक. आयटीआय वयोमर्यादा-18 ते 40, 6) सी.एन.सी. ऑपरेटर एकूण पदे–04 शैक्षणिक पात्रता- दहावी/बारावी व आय.टी.आय (सी.एन.सी) वयोमर्यादा-18 ते 40 जॉब लोकेशन औरंगाबाद.

  Career Tips: अक्षरं बघून व्यक्तिमत्वं ओळखणारे कोण असतात हे ग्राफोलॉजीस्ट? यामध्ये कसा करता येईल करिअर? इथे मिळेल माहिती

  मेगा फिड प्रा. लि.

  फिल्ड ऑफिसर एकूण पदे–23 शैक्षणिक पात्रता- बी.एस.सी. ॲग्री, डीप्लोमा ॲग्री वयोमर्यादा-18 ते 40 जॉब लोकेशन परभणी व हिंगोली.

  अशी करा ऑनलाइन नोंदणी 

  www.rojgar.mahaswayam.gov.in या वेबसाईटवर नोकरी साधक (Job seeker) म्हणून नोंदणी करून आपल्या युजरनेम व पासवर्डचा वापर करून Login बटणावर क्लिक करावे. प्रोफाईल मधील पंडित दीनदयाळ उपाध्याय रोजगार मेळावा या लिंक वर क्लिक करून रोजगार मेळाव्याचा बीड जिल्हा निवडून Filter बटणावर क्लिक करावे. आपल्याला बीड - स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव निमित्त आयोजित पंडित दीनदयाळ उपाध्याय ऑफलाईन रोजगार मेळावा – 3 दिसू लागेल. त्यातील action या पर्यायाखालील दोन बटणापैकी पहिल्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्याची माहिती दिसेल तर दुसऱ्या बटणावर क्लिक केल्यास मेळाव्यातील रिक्त पदे दिसतील. 

  First published:

  Tags: Beed, Beed news, Job