Home /News /maharashtra /

Beed : सोयाबीन पिकावर गोगलगायींचा हल्ला; डोळ्यादेखत उभं पीक नष्ट, पाहा VIDEO

Beed : सोयाबीन पिकावर गोगलगायींचा हल्ला; डोळ्यादेखत उभं पीक नष्ट, पाहा VIDEO

सोयाबीन

सोयाबीन पिकावर गोगलगायींचा हल्ला

जिल्ह्यात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. जिल्ह्यातील 200 हेक्टर खरीप सोयाबीन पिकावर गोगलगायींनी अतिक्रमण केलं आहे.

    बीड 15, जुलै : शेतकऱ्यांना नेहमी अस्मानी किंवा सुलतानी संकटांचा सामना करावा लागतो. यावेळी पावसाने ओढ दिल्याने (Kharif Sowing) खरिपातील पेरण्या लांबणीवर पडल्या होत्या. पावसाच्या दिरंगाईमुळे जूनच्या अखेरीस पेरणी झाली. उशीरा का होईना पेरणी झाली आणि पीक जोमात आले. मात्र, पिकांवर नवीनच संकट निर्माण झाले. जिल्ह्यातील बहुतांश भागात गोगलगायींनी पिकांवर आक्रमण चढवले असून उगवलेली (Soybean Crop) सोयाबीन पूर्णत: नष्ट होत आहे. (Infestation of snails on soybean crop) जिल्ह्यात शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात दिसून येत असल्याने सोयाबीन पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान होण्याची भीती आहे. जिल्ह्यातील 200 हेक्टर खरीप सोयाबीन पिकावर गोगलगायींनी अतिक्रमण केलं आहे. या नवीन संकटामुळे शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ झाली आहे. सुरुवातीच्या काळात पावसाने ओढ दिली होती उशीरा का होईना पेरणी झाली. पेरणीनंतर परत पावसाने दडी मारली होती. मात्र मागील आठवड्यात चांगला पाऊस झाल्याने पिकांना जीवनदान मिळाल. शेतातील डौलदार पीक पाहून शेतकरी खूश होता तेवढ्यात शेतकऱ्यांसमोर नवीनच संकट उभे टाकले आहे. सोयाबीन पिकावर शंखी गोगलगायींचा प्रादुर्भाव झाला. आणि गोगलगायी संपूर्ण पीक नष्ट करत आहेत. यातून शेतकऱ्यांच्या चिंतेत वाढ झाली असून मोठे नुकसान होण्याची शक्यता आहे. हे ही वाचा : महाराष्ट्र पाण्यात बुडाला, मुख्यमंत्री शिंदेंसह आमदार-खासदारांची स्नेहभोजन पार्टी!  जवळपास 200 हेक्टर पिकांवर गोगलगायीचे संकट जिल्ह्यात 7 लाख 85 हजार 786 हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली असून यापैकी 2 लाख 31 हजार हेक्टरवर सोयाबीनचा पेरा झाला आहे. यापैकी जवळपास 200 हेक्टर खरीप सोयाबीन पिकावर गोगलगायींनी अतिक्रमण केलं आहे. जिल्ह्यातील अंबाजोगाई परळी आणि केज तालुक्यातील शेतकऱ्यांना गोगलगायींचा अधिक फटका बसला आहे. शेतीतील अवजारे बाहेरील क्षेत्रात गेल्यावर याच अवजारांसोबत गोगलगायींची अंडी चिटकवून येतात. नदीतून उपसा होणाऱ्या वाळूत देखील गोगलगायीचे प्रमाण अधिक असते. येथूनच या गोगलगायी शेतात येत असल्याचा अंदाज शेतकरी व्यक्त करतात.  बीड तालुक्यातील जीवन चव्हाण यांनी सोयाबीनची दुबार पेरणी केली. त्यावर हजारोंचा खर्च देखील केला. मात्र आता पिकावर गोगलगायीने हल्ला चढवल्याने जवळपास 60 टक्के पीक पूर्णपणे उध्वस्त झालं आहे. शासनाने नुकसान भरपाई द्यावी, अशी मागणी शेतकरी जीवन चव्हाण यांनी केली आहे. वाचा- Akola : डम्पिंग ग्राऊंडवर कचऱ्याचा पहाड; दुर्गंधीमुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात, VIDEO गोगलगायींचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी उपाय गोगलगायीचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शेतकऱ्यांनी शेतातील बांध स्वच्छ म्हणजेच तण विरहीत ठेवावे. स्वच्छतेमुळे गोगलगायींना थांबण्यासाठी आश्रय मिळणार नाही. गोगलगायी गोळा करून त्यावर मिठाच्या पाण्याचा शिडकावा करावा यामुळे गोगलगायी नष्ट होतात. कृषी तज्ञांच्या सल्ल्याने वेळीच फवारणी करावी. जिल्ह्यातील अंबाजोगाई तालुक्यांमध्ये गोगलगायीचा प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात असून आम्ही या ठिकाणी जनजागृती देखील केली आहे. मात्र यासाठी पंचनामे करून नुकसान भरपाई देण्याची कुठलीच तरतूद नाही, अशी माहिती कृषी अधिकारी बाबासाहेब जेजुरकर यांनी दिली.
    First published:

    Tags: Beed, Beed news, Farmer, शेतकरी

    पुढील बातम्या