मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

एका चुकीमुळे घराला लागू शकते आग! मोठं नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी VIDEO

एका चुकीमुळे घराला लागू शकते आग! मोठं नुकसान टाळण्यासाठी 'ही' घ्या खबरदारी VIDEO

इलेक्ट्रिक ऑडिटच्या दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. मोठ्या आस्थापनांमध्ये तर हे ऑडिट महत्त्वाचे आहेच पण त्यासह घरामध्ये देखील वार्षिक इलेक्ट्रिक ऑडिट करणे गरजेचं आहे.

बीड, 13 सप्टेंबर : कोणत्याही इमारतीत ज्याप्रमाणे अग्निशमन प्रतिबंधक साधने आवश्यक आहे. त्याचप्रमाणे इलेक्ट्रिक फिटिंग्जही आवश्यक आहे. त्यानुसार, ठरावीक कालावधीनंतर इलेक्ट्रिक साधने तपासणी करणे आवश्यक आहे. इलेक्ट्रिक ऑडिटच्या (Electrical audit) दुर्लक्षामुळे मोठी दुर्घटना होऊ शकते. मोठ्या आस्थापनांमध्ये तर हे ऑडिट महत्त्वाचे आहेच पण त्यासह घरामध्ये देखील वार्षिक इलेक्ट्रिक ऑडिट करणे गरजेचं आहे.    गॅस सिलेंडरचा स्फोट, पाईप गॅस अव्यवस्थित हाताळणे, ज्वालाग्राही पदार्थ घरात ठेवल्याने आगीच्या घटना घडू शकतात. यात जीवितहानी होऊन लाखो रुपयांच्या नुकसान होण्याची शक्यता असते. बीड जिल्ह्यात मागील आठ महिन्यांत 75 घटना या आग लागल्याच्या समोर आल्या आहेत. विशेष म्हणजे यातील 60 घटनांमध्ये शॉर्टसर्किटचे कारण असल्याचे अग्निशामक दलाकडून सांगण्यात आले आहे. औद्योगिक क्षेत्रासह शहरातील प्रमुख बाजारपेठामधील असणारे गाडी शोरूम, कॉटन जिनिंग, वस्त्र भंडार, महावितरण अंतर्गत येणारे सब स्टेशन, गादीघर, बेकरी, हॉटेल अशा ठिकाणी शॉर्टसर्किटमुळे आग लागण्याच्या घटना मागील काही महिन्यांमध्ये घडलेल्या आहेत. यामुळे लाईट फिटिंगचे ऑडिट किती महत्त्वाचे हे अधोरेखित झाले आहे. हेही वाचा- वादळी वाऱ्यासह तुफान पाऊस; फळबागा जमीनदोस्त, पिकांचेही अतोनात नुकसान पाहा VIDEO शॉर्टसर्किट होण्याचे प्रमुख कारणे  योग्य क्षमतेचे विद्युत वायर एम सी बी, ए एल सी बी, अर्थिंगची व्यवस्था व शासनमान्य विद्युत ठेकेदाराकडून शासकीय कार्यालयासह रुग्णालय यांची विद्युत मांडणी न करून घेणे, यामुळे विद्युत अपघात होण्याच्या घटनाचे वाढ होत आहे.  विद्युत अपघात का वाढतात मागील वर्षापासून विद्युत प्राणघातक अपघात वाढले आहेत. याचे प्रमुख कारणे म्हणजे अनधिकृत विद्युत संच मांडणी वापर. अनेक वेळा विद्युत उपकरणांच्या तारा प्लगमध्ये न लावता स्विच बोर्डवर लावल्या जातात, अशा परिस्थितीत बोर्डमध्ये ओलावा असला तरी शॉर्टसर्कीट होण्याची शक्यता वाढते. प्लगमध्ये कोणत्याही कचरा अडकला तरीही तीच परिस्थिती उद्भवते. सहसा, घराच्या सामान्य वायरिंगवर मोठ्या मशीन चालवण्यामुळे शॉर्टसर्किट होते. शेतामध्ये उसाच्या भोवती वन्य प्राण्यांपासून संरक्षण करण्यासाठी शेतकरी कुंपण करून अनधिकृत आकडा टाकून त्यामध्ये वीजपुरवठा करतात. अनवधानाने त्याच परिसरातील शेतकऱ्यांचे यामुळे अपघात घडतात.  काय घ्याल काळजी प्रत्येक घरामध्ये विजेचे डिटेक्टिव्ह डिव्हाइस असणे गरजेचे आहे. तसेच हॉस्पिटल, मोठ्या आस्थापनांमध्ये स्वतंत्र विद्युत संचासाठी एक अत्याधुनिक रूम असणे गरजेचे आहे. विद्युत संच मांडणीचा रिपोर्ट हा महावितरण विभागाला सोपवणे गरजेचे आहे. दर पाच वर्षाला सर्विस वायर बदलणे आवश्यक असते. ज्या ठिकाणी सर्विस वायरला जोड दिलेली असेल त्या ठिकाणी सक्षम क्षमतेची सर्विस वायर वापरावी. रुग्णालयात एफ आय आर, इडीएस प्रकारचे वायर वापरावे जेणेकरून आग जरी लागली तरी हे वायर जळणार नाहीत. अशी माहिती बीडचे विद्युत निरीक्षक गणेश सोळंके यांनी दिली.  बीड अग्निशामक दलाकडे तीन गाड्या असून बारा कर्मचारी कार्यरत आहेत. मागील आठ महिन्यात आगीच्या घटनेचे 75 कॉल आले. तर 16 ठिकाणी रेस्क्यूच्या घटना होत्या. सर्वाधिक घटना या शॉर्टसर्किटमुळे घडत असल्याची आकडेवारी आहे,अशी माहिती बीड अग्निशामक विभाग प्रमुख  भागवत घायतिडक यांनी दिली.
First published:

Tags: Beed, Beed news

पुढील बातम्या