मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Beed : गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींना बसणार चाप; पोलिसांनी शोधला निर्णायक उपाय, VIDEO

Beed : गुन्हेगारांच्या प्रत्येक हालचालींना बसणार चाप; पोलिसांनी शोधला निर्णायक उपाय, VIDEO

X
सीसीटीव्ही

सीसीटीव्ही कॅमेरा

प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात घडणाऱ्या सर्वच घडामोडींवर या सीसीटीव्हीचा कायमच ‘वॉच’ राहणार आहे.

  बीड, 02 ऑगस्ट : शहरात वाढत्या चोरीच्या घटना, गुन्हेगारी (criminality), आणि एकूणच वाहतुकीवर आता सीसीटीव्ही कॅमेऱ्याची (CCTV cameras) करडी नजर असणार आहे. प्रशासनाच्या वतीने शहरातील प्रमुख भागांमध्ये सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले आहेत. त्यामुळे शहरात घडणाऱ्या सर्वच घडामोडींवर या सीसीटीव्हीचा कायमच ‘वॉच’ राहणार आहे. 

  शहराच्या सुरक्षेची जिम्मेदारी पोलीस विभाग पार पाडते. मात्र, पोलिसांच्या मदतीला आता सीसीटीव्ही कॅमेरे देखील असणार आहेत. शहरात घडणाऱ्या गुन्हेगारीचा तपास करण्यात आणि गुन्हेगारी कमी करण्यात पोलीस यंत्रणेला या सीसीटीव्हीची मदत होणार आहे. शहरातील प्रमुख गजबजलेल्या भागात शाळा, महाविद्यालये, रुग्णालय, बसस्थानक परिसात सीसीटीव्हीची करडी नजर असणार आहे. शहरात सध्या चोरीच्या घटनांमध्ये देखील वाढ होताना दिसत आहे. याचेच गांभीर्य लक्षात घेता बीडचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी शहरातील सर्व प्रमुख परिसरात सीसीटीव्ही बसवले आहेत. सध्या शहरात एकूण 55 सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत आहेत.

  हेही वाचा- लहानपणी वाचा गेली पण जिद्द नाही; ग्रामीण भागातील मुक्या कलावंताची 'बोलकी' चित्रं

  मागील सहा महिन्यापासून शहरात गुन्हेगारीचे प्रमाण वाढले आहे. शहरातून 50 मोटरसायकल चोरीला गेल्या आहेत, 6 जबरी गुन्ह्यांची नोंद आहे, यापैकी 2 सोनसाखळी संदर्भाचे गुन्हे दाखल आहेत. तर शहरात 20 घरफोड्या देखील झाल्याची माहिती आहे. या वाढल्या गुन्हेगारीला चाप बसवण्यासाठी पोलीस यंत्रणेसह सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असणार आहे.

  ...या भागात सीसीटीव्हीची नजर

  शहरातील बलभीम चौक, माळीवेस परिसर, मोंढा बस स्थानक, छत्रपती शिवाजी महाराज चौक, अण्णाभाऊ साठे चौक,  दर्गा रोड परिसर, महाविद्यालय यासह अन्य प्रमुख भागांमध्ये सीसीटीव्ही कार्यरत करण्यात आले आहेत.

  हेही वाचा- खंडोबाचा थाट! Audi Q2 गाडीच्या किंमतीचे बनवले सिंहासन, Special Report

  हाय डेफिनेशन कॅमेरे

  शहरात बसवण्यात आलेले कॅमेरे हे हाय डेफिनेशन आणि व्हेरी फोकल लेन्सचे आहेत. 50 मीटर अंतरापर्यंतची सर्व दृश्य चित्रित करण्याची क्षमता कॅमेऱ्याची आहे. या कॅमेऱ्यात अत्याधुनिक यंत्रणा देखील समाविष्ट आहे.. 

  गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी फायदा

  शहरात बसवण्यात आलेले सर्वच सीसीटीव्ही कॅमेरे कार्यरत असून पोलीस यंत्रणेला गुन्हेगारापर्यंत पोहोचण्यासाठी याचा फायदा होत आहे. आगामी काळात शहरातील इतर भागातही असे कॅमेरे बसवण्याचा प्रयत्न आम्ही करणार असल्याचे पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितले.

  First published:
  top videos

   Tags: Beed, Beed news, Cctv, Maharashtra News